esakal | राज्यस्तरावर दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळवलेले पंचमुखी गणेश मंडळ
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यस्तरावर दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळवलेले पंचमुखी गणेश मंडळ

अत्तार नगरातील पंचमुखी गणेश मंडळाने राज्यस्तरावर दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळवून नावलौकिक मिळवला आहे.

राज्यस्तरावर दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळवलेले पंचमुखी गणेश मंडळ

sakal_logo
By
प्रकाश सनपूरकर

सोलापूर : निरंतर समाजोपयोगी कामे, (Ganesh Chaturthi) शहरातील भव्य लेझीम पथक व भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे अत्तार नगरातील पंचमुखी गणेश मंडळाने (Panchmukhi Ganesh Mandal) राज्यस्तरावर दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळवून नावलौकिक मिळवला आहे. पंचमुखी गणेश मंडळाची स्थापना वर्ष 2000 मध्ये करण्यात आली. त्यानंतर मंडळाने सातत्याने अनेक सांस्कृतिक उपक्रमांना सुरवात केली. अत्तार नगर भागातील अनेक वसाहतीमधील महिला, पुरुष व मुलांना मंडळाने उपक्रमात जोडून घेतले.

हेही वाचा: वर्गणी तुमची, झाडे आमची! रिटेवाडीतील बच्चेकंपनीचा आगळावेगळा उपक्रम

तरुणांना केवळ डीजेच्या ऐवजी लेझीमचा सराव देण्यास सुरवात केली. त्यामध्ये चारशे मुले व मुली सहभगी होऊ लागली. शहरातील एक नामवंत लेझीम पथक म्हणून ते ओळखले जाऊ लागले. मुलांना दांडपट्टा देखील शिकवला जातो. मंडळाने कायमस्वरूपी मंदिर स्थापन केल्याने नवी मूर्ती घेण्याची गरज पडत नाही. वृक्षारोपण व रक्तदानाला मंडळाने प्राधान्य दिले आहे. वर्षभर सामाजिक उपक्रम मंदिराच्या मार्फत सुरू असतात. गणेश जयंतीचा कार्यक्रम देखील फार मोठ्या प्रमाणात होतो. कोरोना व नंतर अतिवृष्टीच्या काळात अनेक गरजूंना मदत करण्यात आली. कोल्हापूर भागात पूरग्रस्तांना मोठ्या प्रमाणात धान्याची मदत पाठवली गेली. यावर्षी कोरोनामुळे कार्यक्रम होणार नसले तरी मंडळाने अत्तार नगरात डास प्रतिबंधक फवारणी व धूर फवारणीचे काम हाती घेतले आहे.

हेही वाचा: टिळकांच्या प्रेरणेतून स्थापन झालेला श्रीमंत मानाचा कसबा गणपती!

लोकमान्य टिळक यांच्या नावाने राज्य सरकारने सर्वोत्कृष्ट गणेश मंडळ स्पर्धा घेतली होती. त्यामध्ये मंडळाने जोरदार सहभाग नोंदवला. लेझीम, समाजसेवा, सांस्कृतिक कार्यक्रम, लोकसहभाग, पर्यावरण रक्षण आदी अनेक कामांच्या जोरावर मंडळाने जिल्ह्यात पहिला क्रमांक मिळवला. तसेच राज्य स्तरावर या मंडळाने द्वितीय क्रमांक पटकावला. या मंडळामध्ये पदाधिकारी म्हणून उमेश वाघमारे, सागर तांबोळकर, महेंद्र कमळे, अष्टविनायक बिराजदार, शुभम राठोड, निखिल रजपूत, विनायक वाढे, विनायक वाघमोडे आदी कार्यरत आहेत.

पंचमुखी गणेश मंडळाने सातत्याने उपक्रमशीलता कायम ठेवली आहे. मूर्ती स्थापना केल्याने आता मूर्तीवर खर्च केला जात नाही. सर्व निधी सामाजिक कार्याच्या उपयोगाला येतो. शहरात माघी गणेश जयंती उत्सवाची एक चांगली परंपरा मंडळाने सुरू केली आहे.

- सागर तांबोळकर, कार्याध्यक्ष, पंचमुखी गणेश मंडळ

loading image
go to top