esakal | 'वर्गणी तुमची, झाडे आमची!' रिटेवाडीतील बच्चेकंपनीचा आगळावेगळा उपक्रम
sakal

बोलून बातमी शोधा

'वर्गणी तुमची, झाडे आमची!' रिटेवाडीतील बच्चेकंपनीचा आगळावेगळा उपक्रम

मंडळातील सर्व सदस्यांनी प्रतिज्ञा केली की, आजपासून वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्‍यक खर्च टाळून त्या पैशातून वृक्षारोपण करायचे.

वर्गणी तुमची, झाडे आमची! रिटेवाडीतील बच्चेकंपनीचा आगळावेगळा उपक्रम

sakal_logo
By
राजाराम माने : सकाळ वृत्तसेवा

केत्तूर (सोलापूर) : रिटेवाडी (ता. करमाळा) (Karmala) येथील नवयुग मित्र मंडळाने श्री गणेश चतुर्थी निमित्त (Ganesh Chaturthi) अनावश्‍यक खर्च टाळून एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे. जमा झालेल्या लोकवर्गणीतून फळझाडांची रोपे खरेदी करून गावातील सर्व घरांसमोर वृक्षारोपण (Plantation) करायचा संकल्प या मंडळाच्या बच्चे कंपनीने केला आहे. श्री गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत गावात वृक्षारोपण करायचे, तसेच कोरोनाबद्दल (Covid-19) जनजागृती करायची तसेच मंडळातील सर्व सदस्यांनी प्रतिज्ञा केली की, आजपासून वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्‍यक खर्च टाळून त्या पैशातून वृक्षारोपण करायचे.

हेही वाचा: शिक्षक, पोलिस उपनिरीक्षक ते महापालिका उपायुक्त! संघर्षमय यशोगाथा

विशेष म्हणजे, या मंडळातील सर्व सभासद हे अठरा वर्षांच्या आतील आहेत. या मंडळाला आशा सेविका ताई पवार, ग्रामपंचायत सदस्या लता देवकते यांनी मार्गदर्शन केले. शुक्रवारी श्री गणेश चतुर्थी दिवशी रिटेवाडीचे पोलिस पाटील ऍड. राजेंद्र पवार यांच्या घरासमोर वृक्षारोपण करून या उपक्रमाची सुरवात केली. तर अनंत चतुर्दशी दिवशी सरपंच दादासाहेब कोकरे यांच्या घरासमोर वृक्षारोपण करून या उपक्रमाचा सांगता करण्यात येणार आहे.

हेही वाचा: झाडू घेतलेल्या हातात लेखणी! अण्णाभाऊंवर लिहून गायली चार गीते

नवयुग मित्र मंडळाचे अध्यक्ष महेश देवकते, सदस्य ऋतुराज पवार, प्रथमेश ढवळे, रोहन पवार, काळूराम देवकते, रोहित पवार, समाधान पवार, विकास पवार, समर्थ पवार, प्रदीप कांबळे, सुजित कांबळे, रोहन ढवळे, आदर्श ढवळे, सोहम पवार, सार्थक ढवळे, रविराज ढवळे, शुभम कांबळे, राज ढवळे, यशराज खरात, पृथ्वीराज पवार, अविनाश खटके, गणेश खटके, समाधान खटके यांचा सहभाग आहे.

loading image
go to top