esakal | रशियन नागरिकांनाही महाराष्ट्रीयन संस्कृतीची भूरळ, वाजत-गाजत गणरायाचं आगमन
sakal

बोलून बातमी शोधा

russian ganesh festival

रशियन नागरिकांनाही महाराष्ट्रीयन संस्कृतीची भूरळ, वाजत-गाजत गणरायाचं आगमन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मास्को : रशियातील पहिल्या पावसाच्या सरींसोबत गणारायाचं आगमन (ganesh festival 2021), आरती, मिरवणूक, अस्सल माराठमोळे शिवकालीन पारंपरीक पोशाख असा दिमाखदार महाराष्ट्रीयन संस्कृतीचा (maharashtra culture) जागर सोहळा नुकताच मॉस्को शहरात पार पडला. रशियन संस्कृती आणि महाराष्ट्रीयन संस्कृतीचा अनोखं मिलन यावेळी पाहायला मिळालं. भारतातील 'रॉयल तष्ट'च्या वतीने या संस्कृतीची आदान प्रदान करणाऱ्या अनोख्या सोहळ्याचे रशियात सादरीकरण करण्यात आले.

हेही वाचा: Ganesh Chaturthi 2021: गणेश मूर्ती स्थापनेचा शुभ मुहूर्त कोणता?

पहिल्या दिवशी आम्ही गणेशोत्सवावरील नृत्य सादरीकरण केले. त्यात अनेक रशियन नागरिक स्वतःहून सहभागी झाले. मराठी गाणी त्यांना खूप आवडली. गणपती आरातीची जणू त्यांना भूरळच पडली. त्यांनी या आरतीचा अर्थ आमच्याकडून भाषांतरीत करून घेतला आणि म्हणण्याचा देखील प्रयत्न केला. अल्बट स्ट्रीट येथे गणेशोत्सव साजरा करण्यात आला. यामध्ये आरती करण्यात आली. त्यानंतर गणेशाची मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी संस्थेचे क्रिएटीव्ह हेड रविंद्र पवार म्हणाले, दौऱ्यातील अनुभव आमच्यासाठी अविस्मरणीय आहे. आपली संस्कृती त्यांना समजावून सांगताना आम्हाला खूप अभिमान वाटला. रशियातील लोकांना मराठी किंवा इंग्रजी कळत नाही. पण त्यांना आपल्या ऐतिहासिक वास्तू आणि संस्कृती बद्दल खूप आकर्षण आहे. त्यांनी दुसऱ्या दिवशी मॉस्को शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी 'शिवजातस्य' हे शिवाजी महाराजांचे कलेक्शन व इतर काही नवीन कलेक्शन सादर केले, असेही त्यांनी सांगितले.

loading image
go to top