दोनशे वर्षांपूर्वी कागदाच्या लगद्यापासून पर्यावरणपूरक मूर्ती तयार करण्यात आली. तेव्हापासून त्याच मूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे.
सांगली : दोन शतकांची परंपरा लाभलेल्या सांगलीच्या पंचायतन गणेशोत्सवाचा (Sangli Ganeshotsav) एक भाग असलेल्या ‘चोर गणपती’ची काल प्रतिष्ठापना झाली. संस्थानच्या गणेशोत्सवास प्रारंभ झाला असून महापूजा झाल्यानंतर निरोप दिला जाणार आहे.