esakal | स्वातंत्र्यपूर्व स्थापन झालेल्या पत्रा तालीम युवक मंडळाचे सामाजिक उपक्रम
sakal

बोलून बातमी शोधा

स्वातंत्र्यपूर्व स्थापन झालेल्या पत्रा तालीम युवक मंडळाचे सामाजिक उपक्रम

वर्षभर सातत्याने सामाजिक उपक्रम राबवत शहरातील मध्यवर्ती मंडळातील पत्रा तालीम युवक मंडळातर्फे रक्तदान शिबिरास प्राधान्य देत गणेशोत्सव साजरा केला जात आहे.

स्वातंत्र्यपूर्व स्थापन झालेल्या पत्रा तालीम मंडळाचे सामाजिक उपक्रम

sakal_logo
By
विजय थोरात

सोलापूर : वर्षभर सातत्याने सामाजिक उपक्रम राबवत शहरातील मध्यवर्ती मंडळातील पत्रा तालीम युवक मंडळातर्फे (Patra Talim Yuvak Mandal) रक्तदान शिबिरास प्राधान्य देत गणेशोत्सव (Ganesh Chaturthi) साजरा केला जात आहे, असे उत्सव अध्यक्ष ओंकार जाधव (Onkar Jadhav) यांनी सांगितले. पत्रा तालीम युवक मंडळाची स्थापना इंग्रजांच्या काळात झाली असून, मंडळाने सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम करण्यास सुरवात केली. शहरातील सर्वांत जुने आणि नावाजलेले मंडळ म्हणून पत्रा तालीम युवक मंडळाची ओळख आहे. मंडळात सामाजिक उपक्रमांबरोबरच मैदानी खेळांनादेखील प्राधान्य दिले जात असल्याचे ओंकार जाधव यांनी सांगितले.

हेही वाचा: राज्यस्तरावर दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळवलेले पंचमुखी गणेश मंडळ

मंडळामध्ये युवक, युवती तसेच परिसरातील आबालवृद्धांचा मोठा सहभाग असतो. मंडळाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये महिला, युवक, युवती यांना प्राधान्य दिले जाते. कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून मिरवणुकीवरील सर्व खर्च हा सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी वापरला जात आहे. डीजेचा आवाज न करता मंडळ स्थापनेपासून लेझीम खेळण्यास प्राधान्य दिले जाते. यामध्ये जवळपास 800 युवकांचा समावेश असतो. शहरातील जुने आणि नावाजलेले मंडळ म्हणून पत्रा तालीम युवक मंडळ ओळखले जाते. गणेशोत्सव आणि शिवजयंतीला लेझीम आणि इतर मैदानी खेळांना प्राधान्य दिले जाते. त्याचबरोबर वृक्षारोप, रक्‍तदान शिबिर, बेघर लोकांना अन्नदान वाटप, कोरोना योद्‌ध्यांचा सत्कार, आरोग्य शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात. मंडळाच्या वतीने वर्षभर सामाजिक उपक्रम घेतले जातात. शिवजयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो.

हेही वाचा: हिंदू-मुस्लिम ऐक्‍याचे प्रतीक 'सोन्या मारुती गणपती'!

ठळक बाबी..

  • कोरोना योद्‌ध्यांचा मंडळाकडून होणार सत्कार

  • वृद्धाश्रमातील नागरिकांना जेवण वाटप

  • शहरातील गरजू नागरिकांना व्हिटॅमिन गोळ्यांचे वाटप

  • शिवजयंतीनिमित्त कुस्ती स्पर्धेचे आयोजन

  • गणेशोत्सव, शिवजयंती उत्साहात साजरी

  • सर्व सण, उत्सव पर्यावरणपूरक साजरे केले जातात

स्वातंत्र्यपूर्वीपासून मंडळाची स्थापना झाली असून, तेव्हापासून ते आजपर्यंत सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी सण, उत्सव साजरे केले जातात. मिरवणुकीला येणारा खर्च हा मागील दोन वर्षांपासून सामाजिक उपक्रम घेऊन खर्च करण्यात येत आहे.

- ओंकार जाधव, अध्यक्ष, पत्रा तालीम युवक मंडळ, सोलापूर

loading image
go to top