कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा 'संगम' पगडी गणेश!

Pagadi Ganesh
Pagadi Ganeshesakal

गणेशोत्सवाच्या निमीत्ताने आपण जाणून घेतोय नाशिक मधील गणपती मंदिरांचे विशेष महत्त्व आणि त्याला असलेला इतिहास.

आज आपण जाणुन घेतोय नाशिकमधील कार्यकर्त्यांच्या मेहनतीने वाड्याचा ओटा ते प्रशस्त संगमरवरी मंदिर असा प्रवास असलेल्या पगडी गणेशाचा इतिहास.

१९७०-७५ च्या आसपास सराफ बाजार, पगडबंद लेन येथील काही तरुणांच्या मनात आले. आपल्या भागात एक आपला हक्काचा गणपती असावा. तोही चांदीचा. कारण हा भाग म्हणजे सोन्याचांदीची बाजारपेठ. मग त्यांनी नगरकर लेनच्या कोपऱ्यावर असलेल्या खेडकर वाड्याच्या ओट्यावर एक गणपती बसवला. दरवर्षी थोडी थोडी चांदी जमा करत काही वर्षातच एक चांदीची गणेश मुर्ती तयार झाली.

गणेशोत्सव साजरा होत होत होता, पण मुर्तीसाठी एक कायमस्वरूपी जागा असावी असं त्यांना वाटु लागलं. बाजुलाच पेंडसे वाडा होता. त्याची भिंत चांगली चार फुट जाडीची होती. मालकांची रीतसर परवानगी घेऊन मग ती भिंत तीन फुटांपर्यंत कोरुन काढली. त्यात गणपतीची स्थापना केली.

अशीही बरीच वर्षे गेली. दरवर्षी पैसे जमत होते. मंडळाचे कार्यकर्ते पण त्यात स्वतःची भर घालत होते. आता गणपतीची मुर्ती चांगली एक्कावन्न किलोची झाली होती. गणपतीचं एक मंदिरच व्हायला हवे असं कार्यकर्त्यांनी ठरवलं.

मग याच भिंतीमागची पेंडसे वाड्यातील जागेची खरेदी झाली. वाड्यातील वरच्या भागाला अजिबात धक्का न लावता आता मंदिर तयार झाले.

२००६ साली नारायणकाका ढेकणे यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन मंदिरात गणपतीची विधीपूर्वक प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

Pagadi Ganesh
दगडी मोदकाचा प्रसाद देणारे बाप्पा "मदन मदोत्कट"

पगडबंद लेन मध्ये फार पुर्वी. म्हणजे पेशव्यांच्या काळात अनेक कुशल, कसबी कारागीर राहत होते. वेगवेगळ्या बांधणीच्या पगड्या बनवण्याचा त्यांचा व्यवसाय. म्हणुनच या भागात स्थापन केलेल्या गणेशाचं नामाभिधान केलं ते 'पगडी गणेश'. या गणपतीच्या मस्तकावर कितीतरी वेगवेगळ्या पगड्या आपल्याला पहायला मिळतात. आजमितीला या मंडळाकडे जवळपास शंभर पगड्या आहेत. आणि या गणपतीला इतर कोणत्याही प्रकारचे मुकुट न घालता फक्त पगडीच वापरली जाते. मस्तकी पगडी धारण करणाऱ्या या गणपतीला मग अजुनच सजवण्यात आलं. त्याचं जानवं...कपाळावर असलेलं गंध यावर शुध्द सोनं चढवण्यात आलं.

खेडकर वाड्याचा ओटा ते प्रशस्त संगमरवरी मंदिर असा हा पगडी गणेशाचा प्रवास थक्क करणारा आहे. आणि याकामी पगडबंद लेन मित्र मंडळ...त्यांचे कार्यकर्ते यांनी अपार मेहनत घेतली आहे.

- सुनील शिरवाडकर, नाशिक.

Pagadi Ganesh
कंठ दाटून आला, हुंदका अनावर झाला !

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com