esakal | दगडी मोदकाचा प्रसाद देणारे बाप्पा "मदन मदोत्कट"
sakal

बोलून बातमी शोधा

Madan Madotkat

दगडी मोदकाचा प्रसाद देणारे बाप्पा "मदन मदोत्कट"

sakal_logo
By
टीम ई सकाळ

गणेशोत्सवाच्या निमीत्ताने आपण जाणून घेतोय नाशिक मधील गणपती मंदिरांचे विशेष महत्त्व आणि त्याला असलेला इतिहास. आज आपण जाणुन घेतोय नाशिकमधील चमत्कारिक 'मदन मदोत्कट' गणपतीचा इतिहास.

गोदावरीपासुन अगदी जवळच असलेल्या गणेश मंदिराचे मालक नित्याची पुजा करण्यास बसले होते. अगदी नेमकेपणाने सांगायचे तर २००६ सालातल्या अक्षय्य तृतीयेचा तो दिवस होता. नेहमीप्रमाणे त्यांनी पितळेच्या वाटीत शेंदुर घेतला. त्यात साजुक तुपाची धार सोडली. व्यवस्थित एकजीव करुन मुर्तीवर शेंदुर लावण्यासाठी ते उभे राहिले...

पण आज मुर्तीवर नेहमीसारखा शेंदुर बसेना. असं का होतंय असा विचार करत असतानाच मुर्तीवरचा एक भाग अचानक खाली पडला. आणि त्यामागे मुर्तीवरील सर्व कवचच गळुन पडलं. आत पाहातात तर काय... एक रेखीव, सुंदर गणेश मुर्ती.

गणेशाचे ते रुप थक्क करणारे होते तेजःपुंज चेहरा... रेखीव डोळे... एखाद्या सुपासारखे पसरलेले कान आणि त्याचे ते दहा हात. मागील आठही हातात वेगवेगळी आयुधे. एक हात गुडघ्यावर वरद अवस्थेत. आणि दुसरा हात छातीवर. जणु काही सांगतोय, काळजी करु नकोस... 'मी आहे!'.

खरंच. दशभुजा असलेली ही विलोभनीय गणेश मुर्ती नाशिककरांना नेहमीच आकर्षित करत आलेली आहे अगदी फार पुर्वी. म्हणजे २०० वर्षापुर्वी ही मुर्ती गोदावरीच्या तीरावर होती असं अभ्यासक सांगतात मग कधीतरी जवळच रहाणाऱ्या हिंगणे गुरुजींना दृष्टांत झाला. स्वप्नात येऊन गणपतीने सांगितले...

"मला तुझ्या घरात घेऊन चल.''

हेही वाचा: चहाच्या कपापासून बाप्पासाठी सजावट: सांबरे कुटूंबीय चर्चेत

तेजःपुंज चेहरा... रेखीव डोळे... एखाद्या सुपासारखे पसरलेले कान आणि दहा हात. मागील आठही हातात वेगवेगळी आयुधे. एक हात गुडघ्यावर वरद अवस्थेत. आणि दुसरा हात छातीवर. दशभुजा असलेली ही विलोभनीय 'मदन मदोत्कट' गणेश मुर्ती नाशिककरांचे श्रध्दास्थान आहे.

तेजःपुंज चेहरा... रेखीव डोळे... एखाद्या सुपासारखे पसरलेले कान आणि दहा हात. मागील आठही हातात वेगवेगळी आयुधे. एक हात गुडघ्यावर वरद अवस्थेत. आणि दुसरा हात छातीवर. दशभुजा असलेली ही विलोभनीय 'मदन मदोत्कट' गणेश मुर्ती नाशिककरांचे श्रध्दास्थान आहे.

मग हिंगणे गुरुजींनी ही मुर्ती घरी आणली. श्री हिंगणे हे पेशव्यांचे उपाध्याय. पेशव्यांनी पण मग याकामी पुढाकार घेतला, आणि मंदिर उभारण्यास मदत केली.

ग्रामदैवत असलेल्या मोदकेश्वर मंदिराच्या मागे हे मंदिर आहे. अगदी आत्तापर्यंत हिंगणेंच्या या घरावर प्राचीन शिलालेख अस्तित्वात होता. एखाद्या लेण्यात प्रवेश करावा अश्या दगडी पायऱ्या चढुन आपण वर जातो. उजव्या हाताला असलेल्या चिरेबंदी चौकात दिसतो विशाल दगडी चौरंग. समोरच लाकडी बांधणीचे घर आणि त्यातील गाभाऱ्यात असलेली मदन मदोत्कट गणपतीची सुंदर मुर्ती. दर्शनाला येणाऱ्या काही नशीबवान भक्तांना येथे मोदकाच्या आकाराचे दगड मिळालेले आहेत. आणि त्यांनीही तो प्रसाद मानुन ते जपुन ठेवलेले आहेत.

कोरोनाच्या (Corona) नियमावली नुसार सध्या मंदिर बंद आहे. पण मंदिरे उघडली की अवश्य या मंदिरात जाऊन मदन मदोत्कट गणपतीचे दर्शन घ्या.

कुणी सांगावे...एखाद्या वेळी तेथे मोदकाचा प्रसाद मिळुनही जाईल.

- सुनील शिरवाडकर, नाशिक.

हेही वाचा: 700 वर्षांची परंपरा जपणार 'कोकणातलं' गाव

loading image
go to top