Ganeshotsav Pune Video: श्रीमंत दगडूशेठ हलवाईच्या आरतीला थायलंडच्या गणेभक्तांची धाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ganeshotsav 2022: Devotees from Thailand performed ganesh aarti

Ganeshotsav Pune Video: श्रीमंत दगडूशेठ हलवाईच्या आरतीला थायलंडच्या गणेभक्तांची धाव

Ganeshotsav 2022: पुण्यातील प्रसिद्ध गणपती मानल्या जाणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या आरतीला थायलंडच्या भक्तांनी हजेरी लावली. गणोशत्सवात सगळीकडे गणेशमय वातावरण झाले आहे. भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरातील गणेशभक्त गणेशोत्सव साजरा करताय. यावेळी थायलंडच्या भक्तांनी गणेशोत्सवात सहभागी होताना हिंदू प्रथेनुसार आपल्या आरत्या म्हणून आरती केली. दरवर्षी थायलंडचे भाविक आवर्जुन येथे दर्शनाला येतात. (Ganeshotsav 2022: Devotees from Thailand performed ganesh aarti)

पुण्यातील दगडूशेठच्या आरतीला आणि दर्शनासाठी दरवर्षी राजकीय पक्षातील नेते, सेलिब्रिटी आणि बरेच दिग्गज पदावरील व्यक्तींसह सगळा भाविक वर्ग गर्दी करत असतो. यावेळी थायलंडच्या या भक्तांचा हिंदू प्रथेनुसार केलेल्या आरतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. तसेच थायलंडच्या या गणेशभक्तांचं कौतुकही केलं जातंय.

राज्यातील नव्हेतर देशभरातून भाविक गणेशोत्सवात दगडुशेठ गणपतीची आरास पाहण्यासाठी येत असतात. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली २ वर्ष गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला होता. मात्र यावर्षी सगळे भाविक दगडूशेठच्या दर्शनाला आवर्जून जाताय.