Ganeshotsav 2022 : गणपती बाप्पा मोऽऽरया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ganeshotsav 2022

Ganeshotsav 2022 : गणपती बाप्पा मोऽऽरया

बालवादकांचा सहभाग : ‘श्रीं’च्या प्राणप्रतिष्ठेच्या मिरवणुकीत यंदा वैविध्य पाहायला मिळाले. दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर निर्बंधमुक्त गणेशोत्सवात अगदी सजावटीपासून ते ढोल-ताशांपर्यंत वेगवेगळे प्रयोग पाहायला मिळाले. मिरवणुकीत युवा ढोल-ताशा वादकांबरोबरच लहानग्या वादकांचाही सहभाग लक्ष वेधणारा होता. पारंपरिक वेशभूषेत ताशा वाजविणारी मुले सर्वांच्याच आकर्षणाची केंद्र बनली. पथकाच्या मध्यभागी उत्साहाच्या वातावरणात त्यांनी वादन केले.

रांगोळीच्या पायघड्या

उत्सवाच्या मंगलमय वातावरणात शुभसंकेत देणारी रांगोळी ही भारतीय संस्कृतीची प्राचीन ओळख. सर्वच मंडळांनी रांगोळीच्या पायघड्या काढल्या होत्या. काही मंडळांनी सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्यांची विशेष योजना केली होती. सिनेअभिनेत्यांचा सहभाग सर्वसामान्यांबरोबरच सिनेअभिनेत्यांनीही मिरवणुकीत सहभाग नोंदविला होता. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळाच्या मिरवणुकीत सिद्धार्थ जाधव यांनी ढोलवादन केले. कलावंत ढोल-ताशा पथकाने ग्रामदैवत कसबा गणपती येथे वादन केले.

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त रहदारीचे नियमन असो की, भाविकांची रांग पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. मुख्य मिरवणूक रस्त्यांवर अडथळे टाकून वाहतूक वळविण्यात आली होती. ध्वनितीव्रता तपासणारे पोलिस ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी मिरवणुकीत आवाजाची पातळी निश्चित करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी जागोजागी संयंत्राद्वारे मोजणी केली.

सोशल मीडियाचा फिव्हर मिरवणुकीचे अपडेट प्रत्येक मिनिटाला सोशल मीडियावर टाकण्यासाठी तरुणाई रिल्स, व्हिडिओ, छायाचित्रांचा वापर करताना दिसली. मिरवणुकीतील वादन असो की श्रींची मूर्ती, ही सर्व क्षणचित्रे टिपण्यासाठी आबालवृद्धांचे मोबाईल सरसावले होते. एवढंच काय... हौशी छायाचित्रकारांनी ‘कॅंडीड’फोटो टिपले.

Web Title: Ganeshotsav 2022 Ganesh Chaturthi Festival Idols Procession

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..