Ganeshotsav 2022 : कागदकामातून गणपतीची शिल्पे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ganesh Chaturthi festival paper art ganesh idol

Ganeshotsav 2022 : कागदकामातून गणपतीची शिल्पे

पुणे : शहरातील सतीश घाटपांडे हे कागदकामातून निरनिराळ्या प्रकारची शिल्पे घडवतात. बावीस वर्षांत त्यांनी निर्मिलेल्या सुमारे दोनशे शिल्पांपैकी दहा गणपतीच्या विविध रूपांची आहेत.

‘‘कागदाचे हव्या त्या प्रमाणात आकार कापून ते एकावर एक लावत ही शिल्परचना करावी लागते. आधी कागदावर आरेखन, मग त्यानुसार कागद कापणे, त्यांचे एकावर एक तीस - चाळीस थर नेमकेपणाने रचणे व सरतेशेवटी त्रिमिती स्वरूपात तयार होणारी कलाकृती; या प्रक्रियेत किमान सहा- सात दिवस तरी जातात. सूक्ष्म काम असेल तर जास्त लागतात. या कलेतून गणपती साकारताना मला नेहमीच खूप प्रसन्न वाटत आलेलं आहे. या माध्यमातून मी बावीस वर्षांपूर्वी उभा गणपती घडवला होता,’’ असे घाटपांडे यांनी सांगितले.

घाटपांडे म्हणाले, आतापर्यंत मी दोनदा अष्टविनायक साकारले आहेत. मंदिरांमधील शिल्परचनांमध्ये गणपती वेगवेगळ्या स्वरूपात असतो, तसं एकदा कागदकामातून घडवलं. भिंतीवरील वरच्या कोनाड्यात गणपती व खालच्या कोनाड्यातून डोकं बाहेर काढलेला उंदीर, अशा तऱ्हेची रचना अनेकांना आवडली. एका शिल्पात स्थिर बसलेला उंदीर तर दुसऱ्यात तो पळताना दाखवला आहे. कागदकामाच्या माझ्या नेहमीच्या पद्धतीशिवाय वेगळ्या तऱ्हेनेही मी मध्यंतरी गणपती तयार केला होता. जुन्या वर्तमानपत्राचे गोळे करून ते एकावर एक रचत, चिकटवले. नंतर त्यावर रंगकाम केलं. प्रयोग म्हणून शाडूमातीचा गणपतीही घडवला. कधी कॅनव्हासवर अॅक्रेलिक रंगांमधून तो चित्रित केला.