Ganeshotsav 2022 : सोळा वर्षांपासून दोन गाव एक गणपती

माजलगाव शेलापुरी, रेणापुरी येथील ग्रामस्थांची आदर्श परंपरा
Ganeshotsav 2022 one village one idol beed
Ganeshotsav 2022 one village one idol beed

माजलगाव : शहरापासून जवळच असलेल्या शेलापुरी - रेणापुरी या दोन गावांत मागील सोळा वर्षांपासून दोन गाव असताना देखील एकच गणेशमूर्ती स्थापना करण्यात येते. सामाजिक एकात्मतेचे दर्शन घडविणारा असा प्रयोग तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यामध्ये कुठेच होत नसल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे. दोन्हा गावांच्या मध्यभागात मंडळाकडून मूर्तीची स्थापना केली जाते माजलगाव धरणाच्या निर्मितीमुळे पुनर्वसित झालेल्या शेलापुरी-रेणापुरी गावाची एकूण लोकसंख्या साडेतीन हजार आहे. शहराला लागूनच ही गावे आहेत.

शेलापुरीची लोकसंख्या दोन हजार तर रेणापुरीची लोकसंख्या दीड हजार आबे. येथील शिवगर्जना गणेश मंडळ समाजप्रबोधनपर कार्यक्रमांत नेहमीच पुढे असते. यंदा देखील स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात मंडळ सहभागी आहे. विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव मिळावा यासाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत शिवचरित्र व्याख्यान, गावातील ज्येष्ठ महिला, पुरुषांसाठी कीर्तनाचे आयोजनही करण्यात आले आहे

मंडळाची चांदीची गणेश मूर्ती असून मंडळाच्या वतीने दरवर्षी शाडू मातीपासून तयार केलेली गणेशमूर्तीच स्थापन केली जाते. गणेश विसर्जनानंतर ही चांदीची मूर्ती गावातील विठ्ठल-रखुमाई मंदिरात ठेवली जाते. प्रत्येक चतुर्थीला या गणेशाचे पूजन केले जाते. विविध समाजोपयोगी उपक्रमात मंडळ सक्रिय असल्याने राज्य शासनाचा पुरस्कार देखील मंडळास मिळालेला आहे. गाव लहान जरी असले तरी गावात गणेशोत्सवात एकापेक्षा अनेक मंडळे असतात. मात्र शेलापुरी व रेणापुरी या गावांतील नागरिकांनी दोन गावांसाठी एकच मंडळ स्थापन करून एक गणपती बसविण्याची सुरू केलेली परंपरा अनेकांसाठी आदर्शवत ठरणारी आहे.

कोरोनाच्या काळात साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला पण सामाजिक दायित्व सांभाळत शहराबाहेर असलेल्या पालावरील कुटुंबांना किराणा किटचे वाटप मंडळाच्या वतीने करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर कोरोनाबाबत मंडळाने जनजागृती देखील केलेली आहे. कोरोनानंतर यावर्षीचा गणेशोत्सव जल्लोषात साजरा करण्यात येत असून आकर्षक विद्युत रोशणाई, विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

- अशोक शेंडगे,अध्यक्ष, गणेश मंडळ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com