विधायक! शेवगावमध्ये साम्राज्य युवा गृपकडून ‘आरोग्य उत्सव’

Health festival by Samrajya Yuva Grup in Shevgaon
Health festival by Samrajya Yuva Grup in Shevgaon

शेवगाव (अहमदनगर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेला गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करत दरवर्षीप्रमाणे दहा दिवस होणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रमाना फाटा देवून व त्यासाठी येणारा अनावश्यक खर्च टाळून धनगरगल्ली येथील साम्राज्य युवा ग्रुपने आरोग्य उत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार त्यांनी शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये औषध फवारणीसाठी नगरपरपालिकेला सहा ट्रक्टर उपलब्ध करुन दिले आहेत.

कोरोनाच्या काळात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कोरोना योध्दांना मालेगाव काढा मोफत उपल्बध करुन दिला. कोरोनाच्या काळात ग्रुपच्या या आरोग्यदायी विधायक उपक्रमामुळे शहरातील नागरीकांना त्याचा फायदा होणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आलेला गणेश उत्सव नागरीकांसाठी एक उत्सव न राहता त्यामाध्यमातून या आजाराचा संसर्ग पसरु नये म्हणून काळजी घेणे आवश्यक ठरले आहे. दरवर्षी विविध उपक्रमांनी गणेश उत्सव धुमधडाक्यात साजरा करणाऱ्या अनेक गणेश मंडळांनी तो साध्या पध्दतीने साजरा करण्यावर भर दिला आहे. मात्र शहरातील धनगरगल्ली येथील साम्राज्य युवा ग्रुप व नगरसेवक सागर फडके यांनी पुढाकार घेवून यंदाचा हा उत्सव आरोग्य उत्सव म्हणून साजरा करण्याचे ठरवले.

साध्या पध्दतीने श्री गणेशाची प्रतिष्ठापणा करत उर्वरीत खर्चातून वेगवेगळे आरोग्य विषय उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. पावसाळा व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व 21 प्रभागात जंतू नाशक फवारणीसाठी नगरपरीषदेला सहा ट्रक्टर उपलब्ध करुन दिले. डिझेलचा व इतर खर्च ग्रुप कडून करण्यात येणार आहे. नगरपरीषदेचे मुख्याधिकारी अंबादास गर्कळ, नगराध्यक्षा राणी विनोद मोहीते यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी नगरसेवक सागर फडके, ज्येष्ठ नगरसेवक नंदकुमार सारडा, गणेश कोरडे, आरोग्य विभागाचे प्रमुख समाधान मुंगसे, विजय जाधव, भारत चव्हाण, दत्तात्रय साळवे आदी उपस्थित होते.

कोरोना संसर्गाच्या काळात विविध पातळीवर काम करणा-या आरोग्य विभाग, महसूल, पोलीस ठाणे, नगरपरीषदेच्या अधिकारी, कर्मचारी यांच्यासह कोवीड सेंटरमधील डाँक्टर व कर्मचा-यांना आयुर्वेदीक काढा पावडरचे वाटप मुख्याधिकारी गर्कळ यांच्या हस्ते करण्यात आले. कोरोना काळात मयत झालेल्या शहरातील नागरीकांना व राज्यभरातील शहीद कोरोना योध्दयांना श्रध्दांजली वाहणारे फलक लावण्यात आले आहेत.

या उपक्रमासाठी संदीप जाधव, सचिन लवांडे, आदेश फडके, अमृत काळे, आकाक्ष लवांडे, गणेश तोतरे, अभिषेक फडके, प्रसाद नेमाणे, आदीत्य झिरपे, अक्षय काळे, प्रसाद कबाडी, विशाल केसभट, शुभम काथवटे, ओमकार कोरडे, शाहरुख पिंजारी इतर पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

संपादन : अशोक मुरुमकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com