Gauri avahan 2022 : ज्येष्ठा गौरीच्या आगमनाच्या दिवशी हे उपाय करा, नशीब फळफळेल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gauri avahan 2022

Gauri avahan 2022 : ज्येष्ठा गौरीच्या आगमनाच्या दिवशी हे उपाय करा, नशीब फळफळेल

Jyeshtha Gauri Avahana 2022 : भाद्रपद शुक्ल सप्तमीला अनुराधा नक्षत्रात ज्येष्ठा गौरी म्हणजे महालक्ष्मीला आगमन होणार आहे. गौरी ही गणपती आई आणि माता लक्ष्मीची थोरली बहीण आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात गौरी गणपतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भाद्रपद महिन्यात शुक्ल सष्टमीला अनुराधा नक्षरात घरा-घरात ज्येष्ठा गौरी म्हणजे महालक्ष्मीचं आगमन होत आहे. काही ठिकाणी गौरीला गणरायाची आई तर काही ठिकाणी बहीण संबोधले जाते.

दंतकथांनुसार, माता गौरी ही देवी पार्वतीचा अवतार आहे. गौरी ही गणपतीची आई म्हणजे माता आहे. म्हणून काही भागात या सणाला महालक्ष्मी पूजा असे देखील म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूची पत्नी देवी लक्ष्मीची पूजा अर्चना केली जाते. गौरी गणपतीवर भाविकांची अपार श्रद्धा आहे. गौरीच्या आगमनाच्या दिवशी विशेष उपाय केल्या आयुष्यभर कशाचीही कमतरता भासत नाही. नोकरीसह व्यवसायात भरभराटी येते

करा हे उपाय

घरात कायम पैशाची चणचण भासत असेल तर ज्येष्ठा गौरीला नवा झाडू अर्पण करून तो चौकात टाकून द्यावा.

घरात अनुचित घटना घडत असतील तर लिंबावर लवंग खोचून डोक्यावरून ७ वेळा उतरवून ज्येष्ठा गौरीला अर्पण करावे.

ज्येष्ठा गौरीला अर्पण केलेल्या काजळाचा टिळा कपाळावर लावल्याने उत्तम आरोग्य प्राप्त होते.

ज्येष्ठा गौरीला अर्पण केलेले उडीद गरीब महिलेला दान केल्याने आयुष्यात प्रगती होते.

कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी ज्येष्ठा गौरीला ६ लवंग अर्पण करून ते कापूरमध्ये जाळाव्यात.

आर्थिक नुकसान टाळण्यासाठी ज्येष्ठा गौरीला निळे कनेरचे फूल अर्पण करावे.

नोकरीत प्रमोशन मिळवण्यासाठी ज्येष्ठा गौरीला लवंग अर्पण करून ते ऑफिसमधील ड्रावरमध्ये ठेवाव्यात.

शैक्षणिक प्रगतीसाठी ज्येष्ठा गौरीला तेजपान अर्पण करून ते सॅकमध्ये ठेवावे.

व्यापार-व्यवसायात यशस्वी होण्यासाठी ज्येष्ठा गौरीला ११ बदाम अर्पण करून कामगारांना प्रसाद म्हणून द्यावे.

उत्तम लव्हलाईफसाठी काळ्या स्केच पेनाने कागदावर प्रेयसी आणि प्रियकराचे नाव लिहून ज्येष्ठा गौरीच्या चरणी ठेवावा.

उत्तम वैवाहिक जीवनासाठी पती-पत्नीने शिव मंदिरात जाऊन माता गौरीला नारळ अर्पण करावे.