
तुमच्या गणेशोत्सवाचा उत्साह आता सकाळच्या सोशल मीडियावरही झळकणार! सकाळ घेऊन आलंय एक खास डिजिटल अभियान – ‘My Bappa Stories with Sakal’, जिथे तुम्ही आपली अनोखी गणेशोत्सवाची गोष्ट फोटो आणि रील्समधून सांगू शकता.
गणपती बाप्पासोबतचा खास अनुभव, परंपरा आणि आठवणी सगळ्यांसोबत शेअर करू शकता. तुमच्या डेकोरेशनचे फोटो, गणरायाच्या आगमनाचा व्हिडीओ, घरगुती मोदकांची तयारी किंवा विसर्जनाच्या क्षणांचा भावनिक रील – या सगळ्यांतून तुमची कहाणी इतरांपर्यंत पोहोचू शकते.