
Jyeshtha Gauri Avahan 2025: आज प्रत्येक घरात उत्साहाचे वातावरण आहे. कारण आज लाडकी माहेरवाशीण गौराई घरोघरी येणार आहे. गौराई सोन्याच्या पावलाने घरात येतात. त्यांना आजच्या दिवशी भाजी भाकरीचा तर उद्याच्या दिवशी गोडाधोडाचा नेते दाखवला जातो. या वेगळ्या नैवेद्याची परंपरा आहे.
पण महाराष्ट्रातल्या काही गावात गौराईच्या नैवेद्याची एक वेगळी परंपरा आहे. कोकणातल्या काही गावात गौराईला मांसाहराचा नैवेद्य दाखवला जातो. गौराई, महालक्ष्मी, महाकाली या रूपातही पूजली जाते. त्यामुळेच हा वेगळा नैवेद्य देवीला दाखवला जातो.