esakal | ऋषिपंचमीला 25 हजार महिलांनी म्हटले सामूहिक अथर्वशीर्ष 
sakal

बोलून बातमी शोधा

ऋषिपंचमीला 25 हजार महिलांनी म्हटले सामूहिक अथर्वशीर्ष 

ऋषिपंचमीला 25 हजार महिलांनी म्हटले सामूहिक अथर्वशीर्ष 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - शंखध्वनी होताच महिलांनी सामूहिकरीत्या केलेला ओंकार... गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष... पहाटेच्या मंगलमय वातावरणात एकासुरात म्हटलेलं अथर्वशीर्ष.... हरिओम्‌ नमस्ते गणपतये, त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसी, त्वमेय केवलं कर्तासी.... अन्‌ सामूहिक आरतीनंतर पुन्हा मोरया-मोरयाच्या जयघोषाने 25 हजारांहून अधिक महिलांनी "श्रीं'स आपली सेवा वाहिली. तसेच, "इंधन वाचवा'चा संदेश देत स्त्री शक्तीचा जागरही केला. निमित्त होते ऋषिपंचमीचे... 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने शुक्रवारी महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण झाले. या वेळी "फिनोलेक्‍स'च्या रितू छाब्रिया, पोलिस उपायुक्त (वाहतूक) तेजस्वी सातपुते, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे (एमएनजीएल) संचालक संतोष सोनटक्के, ट्रस्टचे कोशाध्यक्ष महेश सूर्यवंशी, उल्हास भट, अरुण व शुभांगी भालेराव, मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, राजेश सांकला उपस्थित होते. महिलांच्या सामूहिक अथर्वशीर्ष पठण उपक्रमाचे हे 32 वे वर्ष होते.