खिर्डीच्या शिवारात अवतरले गणराय, व्यापले दोन एकर

मधुकर कांबळे
Sunday, 3 September 2017

शेतकरी कुलस्वामिनी प्रतिष्ठानचे विलास कोरडे व अलका कोरडे यांनी. पाणी बचत, पर्यावरण संवर्धनाचे लोकांना संदेश यातुन देण्याचा प्रयत्न केला आहे. दोन महिन्यांपूर्वी हे बियाणं पेरले होते. बेडशीट, घोंगडी व लोखंडी टोपल्याचा वापर करण्यात आला आहे.

औरंगाबाद : खुल्ताबाद तालूक्याच्या खिर्डी शिवारात 2 एकरात साकारला आहे, निसर्गराजा गणेश. गहू, स्वीट काॅर्न आणि ज्वारीच्या 45 किलो तृणधान्य पेरून गणराय साकारले आहेत.

शेतकरी कुलस्वामिनी प्रतिष्ठानचे विलास कोरडे व अलका कोरडे यांनी. पाणी बचत, पर्यावरण संवर्धनाचे लोकांना संदेश यातुन देण्याचा प्रयत्न केला आहे. दोन महिन्यांपूर्वी हे बियाणं पेरले होते. बेडशीट, घोंगडी व लोखंडी टोपल्याचा वापर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा गणेश तयार करण्यासाठी हिंदू मुस्लिम सहकार्यांनी परिश्रम घेतले आहेत.  2 एकरात गणराय साकारला आहे पण त्यांच्या कृपेने तृणधान्याची उगवनही झाली आहे.

मका, गहू,ज्वारी दोन ते तीन फूट उंचीवर आले आहे.शेतकरी विलास कोरडे म्हणाले, बाप्पा आमच्या पाठीशी आहे, बापाहो शेतकऱ्यांनो खचू नका, आत्महत्या करू नका , पाणी आडवा, पाणी जिरवा. ठिबकनेच रान भिजवा असे आवाहन केले. 150 बाय 150 च्या शेततळ्यात गेल्या पावसाळ्यात साठलेले 30 फूट पाणी आहे, सुरूवातीला येऊन नंतर पावसाने हात अखडता घेतल्यानंतर याच शेततळ्यातील पाण्यावर निसर्गराजा गणेश, भव्य  शिवलिंग आणि मुषकराज हिरेगार दिसत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad news ganpati in farm