esakal | बदलापूरचे बाप्पा सातासमुद्रापार
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

बदलापूरचे बाप्पा सातासमुद्रापार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बदलापूर : भारतीय माणूस जगात कुठेही गेला तरी त्याची नाळ ही नेहमीच आपल्या मातीशी, संस्कृतीशी जोडलेली असते. त्याचेच उत्तम उदाहरण म्हणजे परदेशातही भारतीयांकडून साजरा होणारा गणेशोत्सव. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथून मार्च महिन्यात परदेशवारीसाठी निचलेल्या गणेशमूर्ती गणेशोत्सवापूर्वी इच्छित ठिकाणी पोहोचवल्या जात आहेत.

अनेक देशांतील निर्यातबंदी शिथिल झाल्याने बाप्पाचा मार्ग सुकर झाला. दरम्यान, बदलापूरच्या चिंतामणी क्रिएशन्सच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती या सध्या अमेरिका, दुबई यांसह अनेक देशांतील भव्य प्रदर्शनात विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.बदलापूर शहरातील तरुण उद्योजक आणि चिंतामणी क्रिएशन्सचे सर्वेसर्वा निमेश जनवाड हे गेली ५ वर्षे गणेशोत्सवानिमित्त परदेशात गणेशमूर्तीच्या विक्रीचा व्यवसाय करीत लाखांचे नुकसान झाले होते.

मात्र यंदा गणेशमूर्तीच्या परदेशातील निर्यातीला परवानगी मिळाल्याने शाडू माती, लाल माती आणि कागदापासून तयार केलेल्या १८ हजारांहून अधिक मर्तीची विक्री केल्याचे जनवाड यांनी सांगितले. चिंतामणी क्रिएशन्सकडून या वर्षी ६ इंचापासून ते ५ फुटांपर्यंतच्या आल्या आहेत.

हेही वाचा: नवसाला पावणारा हिंगोलीचा चिंतामणी गणपती

गणेशमूर्ती परदेशात पाठवण्यात बदलापूरच्या चिंतामणी क्रिएशन्सच्या गणेशमूर्ती दुबई, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, लंडन, सिंगापूर, कॅनडा, मॉरिशस, दक्षिण आफ्रिका आदींसह अनेक देशात निर्यात केल्या जातात. यंदा निमेश यांनी परदेशातील विक्रेत्यांसह, सातासमुद्रापार राहून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांनाही मूर्ती पोहोच केल्या आहेत.

loading image
go to top