मक्याचा उपमा : गणपती बाप्पांसाठी खाऊंची मेजवाणी!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 सप्टेंबर 2018

गणपती घरी आले की घरात खाण्यापिण्याची चंगळ ऐरवीपेक्षा जरा जास्तच असते, नाही का! गणपती बाप्पांसाठी दहा दिवस नवनवीन प्रसाद कोणता बनवावा याची लिस्ट तर काहीजण आधीच बनवून ठेवतात. पण तुमच्या या लिस्टमध्ये 'हा' प्रसादाचा पदार्थ आहे का? अहो नसेल तर लगेच शामिल करा. गणपती बाप्पाला खुश करायचं आहे ना.. मग या पदार्थांची रेसिपीखास गणेशोत्सव निमित्ताने आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत... 

मक्याचा उपमा -
गणपती बाप्पांच्या प्रसादात मक्याचे दाणे हमखास असतातच. मक्याचा हा पदार्थ गोड नसला तरी मक्याचे दाणे बाप्पांचे फेवरेट तर आहेत ना. मग ही रेसिपी बाप्पांना नक्की आवडेल. मक्याचे दाणे मिक्सरमधून रवाळ बारिक करा. कढईत तेल मोहरी, कठीपत्ता, हिरवी मिरची, कांदा परतून घ्या. यात मक्याच्या दाण्याचे मिश्रण टाका. साध्या उपम्याप्रमाणे हे मिश्रणही नीट भाजून घ्या. त्यानंतर दही/पाणी टाका. 2-3 मिनीट शिजू द्या. वरुन कोथिंबीर टाका. मक्याचा उपमा तयार.
 

उकडीचे मोदक
चॉकलेट शिरा मोदक : गणपती बाप्पांसाठी खाऊंची...
केळीचे मोदक : गणपती बाप्पांसाठी खाऊंची मेजवाणी!
सेवन वडी : गणपती बाप्पांसाठी खाऊंची मेजवाणी!
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ganapati special makyacha upma