Ganeshotsav 2022: दुर्मिळ मुहूर्तावर विराजमान झाले बाप्पा १० वर्षांनी जुळून आलाय ‘असा’ योगायोग

यंदाच्या गणेश चतुर्थीला एक खास योग जुळून आला आहे.
Ganesh chaturthi 2022 shubh yog
Ganesh chaturthi 2022 shubh yog Esakal

आज गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर मोठ्या उत्साहात घरोघरी बाप्पा विराजमान होत आहेत. रात्रीपर्यंत मोठे गणपती मंडळांमध्ये आसनस्थ होतील. पण, तुम्हाला माहिती आहे का, यंदाच्या गणेश चतुर्थीला एक खास योग जुळून आला आहे.

यंदा गणेश चतुर्थी ३१ ऑगस्टला म्हणजे आज बुधवारी आहे. अशात एक दुर्लभ योग यादिवशी तब्बल १० वर्षांनी जुळून आला आहे. ज्योतिषाचार्य आलोक गुप्ता यांच्या माहितीनुसार, गणपती बाप्पाचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला स्वाति नक्षत्रावर म्हणजेच बुधवारी दुपारच्या वेळी झाला होता. त्यामुळे यावर्षीही गणेश चतुर्थीच्या दिवशी बुधवार आला आहे.

Ganesh chaturthi 2022 shubh yog
Ganeshotsav 2022 : गणेशपूजेसाठी २१ प्रकारच्या पत्रींचा अभ्यास

याआधी असाच योग १० वर्षांपूर्वी म्हणजे २०१२ मध्ये जुळून आला होता.

कोरोना काळ गणेशमुर्ती बनवणाऱ्या कारागीरांपासून ते गणेशोत्सव साजरा करणाऱ्या सर्वांसाठीच अवघड होता. २ वर्ष गणेशोत्सव साजरा झाला.पण, त्यावरही निर्बंध लागू होते. ३१ ऑगस्टला बाप्पा विराजमान होतात तर ९ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे. त्यामुळे या १० दिवसात गणेशोत्सवात अभुतपूर्व उत्साह पहायला मिळेल यात शंकाच नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com