
कोल्हापूर - येथे तब्बल 22 तास गणेश विसर्जन मिरवणुक चालली. डीजे शिवाय विसर्जन मिरवणूक पार पाडल्याचा आनंद जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. पोलिसांचा डान्स करून आनंद व्यक्त केला.
कोल्हापूर - येथे तब्बल 22 तास गणेश विसर्जन मिरवणुक चालली. डीजे शिवाय विसर्जन मिरवणूक पार पाडल्याचा आनंद जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. पोलिसांचा डान्स करून आनंद व्यक्त केला.
दरम्यान, ढोल ताशाचा ठेका व लेसर शोच्या झगमगाटात रात्री नऊनंतर महाद्वार रोड गर्दीने फुलून गेला. रात्री दोन वाजता पाटाकडील तालीम मंडळाची मिरवणूक आली आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले. उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम, उमेश कांदेकर युवा मंच, दिलबहार तालीम मंडळ, पी. एम. बाॅईज, अवचितपीर, वेताळ तालीम, बालगोपाल, बागल चौक मंडळांच्या मिरवणुकांनी हजारो भाविकांची गर्दी खेचून धरली.
सुबराव गवळी तालीम मंडळाची मिरवणूक आणि सात वाजता महाद्वार चौकात आली. पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमुळे कार्यकर्त्यांनी सुमारे तासभर रस्त्यावरच ठिय्या मारला. त्यानंतर मिरवणूक पूर्ववत झाली. मात्र, उत्तरोत्तर मिरवणूक रेंगाळत गेली. ढोल ताशाच्या कडकडाटात कार्यकर्त्यांचा उत्साह मात्र कायम राहिला. अक्षय मित्र मंडळ, धार ग्रुप, शाहूपुरी, शाहूपुरी युवक मंडळाच्या पाठोपाठ मिरवणुका होत्या. शाहूपुरी च्या मिरवणुकीत बाराबंदी पोषाख घातलेले मावळे होते. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा चित्ररथही मिरवणुकीत होता. युवक क्रांती दलानंतर पाटाकडील तालीम मंडळाची होती. ती रात्री दोन वाजता पापाची तिकटी येथे आली. ब्राझीलच्या खेळाडूंचे कट आउट, निळे पिवळे झेंडे मिरवणुकीत होते.
उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम, उमेश कांदेकर युवा मंच, दिलबहार तालीम मंडळ, पी. एम. बाॅईज, अवचितपीर तालीम मंडळ, वेताळ तालीम, बालगोपाल तालीम मंडळ, बागल चौक मंडळ, जुना बुधवार तालीम, एस. बी. ग्रुप,अचानक, बी.जी.एम, झुंजार क्लब, खंडोबा, स्पायडर ग्रुप, जय भवानीच्या मिरवणुका मागोमाग होत्या. त्यांनी सारी रात्र जागवली. हिंदवी, दयावान, शिवाजी तालीम, महालक्ष्मी धर्मशाळेची मिरवणूक पहाटे तीन वाजता ताराबाई रोडवरच होती.