Ganesh Festival : दुबईत गणरायाचा गजर!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 सप्टेंबर 2018

औरंगाबाद - देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावणारा गणेशोत्सव पूर्वीच सातासमुद्रापार गेला आहे. दुबईत राहणाऱ्या मराठीबांधवांना एकत्रित येण्यासाठी कारण ठरलेल्या 

औरंगाबाद - देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावणारा गणेशोत्सव पूर्वीच सातासमुद्रापार गेला आहे. दुबईत राहणाऱ्या मराठीबांधवांना एकत्रित येण्यासाठी कारण ठरलेल्या 

पाच दिवसीय गणेशोत्सवाला आजपासून सुरवात झाली. यंदा या मंडळाचे हे ४५ वे वर्ष असल्याची माहिती दुबईतील उद्योजक नितीन सास्तकर यांनी दिली. 
दुबईत मराठी भाषकांची संख्या मोठी आहे. महराष्ट्राच्या मातीतील महत्त्वाचा उत्सव असलेल्या गणेश आगमनाचा सण या परभूमीवरील मराठी लोकांनीही आनंदात सुरू केला. सोमवारी (ता. १७) या दुबईतील गणेशोत्सवाची सांगता होणार असून, या पाच दिवसांत रोज सुमारे बारा तास विविध उपक्रम घेतले जाणार आहेत. 

दुबईत राहणाऱ्या मराठीबांधवांच्या भावी पिढीचा संबंध मराठीपणाशी आणि महाराष्ट्राच्या मातीशी टिकून राहण्यासाठी लहान मुलांच्या हस्ते आरतीचे आयोजन यंदा करण्यात आले. गुरुवारी स्थापनादिनी या चिमुकल्यांनी सायंकाळी साडेआठला गणरायाची सामूहिक आरती केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh Festival Ganeshotsav Celebration in Dubai