Ganesh Visarjan: जाता जाता बाप्पा करणार ‘या’ चार राशींवर कृपा

ज्योतिषशास्रानुसार बाप्पा जाता जाता या खालील चार राशींवर आपली कृपा दाखवणार आहेत. त्या चार राशी कोणत्या, हे जाणून घेऊया.
Ganesh Visarjan
Ganesh Visarjanसकाळ

आज देशभरात गणेश विसर्जनाची धामधूम दिसतेय. दहा दिवसांनंतर बाप्पा निरोप घेत आहे. बाप्पांच्या शेवटच्या दर्शनासाठी प्रत्येकजण आतूर आहे. बाप्पांची कृपा आपल्यावर व्हावी, अशी प्रत्येकांची मनोमन इच्छा असते. आज आम्ही तुम्हाला अशाच चार राशींबद्दल सांगणार आहोत ज्यांंच्यावर बाप्पांची विशेष कृपा होणार आहे.

ज्योतिषशास्रानुसार बाप्पा जाता जाता या खालील चार राशींवर आपली कृपा दाखवणार आहेत. त्या चार राशी कोणत्या, हे जाणून घेऊया. (Bappa will show grace on these zodiac signs check here list)

Ganesh Visarjan
Astrology: ‘या’ तीन राशींच्या लोकांना सहज मिळतं त्यांचं खरं प्रेम

मिथून राशी -

ज्योतिषशास्त्रानुसार मिथून राशीवर गणेश चतुर्थीपासूनच बाप्पांची कृपा आहे. बाप्पा जाता जाता मिथून राशींच्या लोकांवप विशेष कृपा करणार आहे. या राशींच्या लोकांना नोकरी व्यवसायात भरघोस यश मिळू शकते. याशिवाय येणाऱ्या दिवसांमध्ये या लोकांचे नशीब सुद्धा बदलू शकते.

कर्क राशी-

ज्योतिषशास्त्रानुसार कर्क राशींसाठी शुभ दिवस सुरू झालेत. यांच्या मार्गातील अडथळे दुर होण्याची शक्यता आहे. शिवाय यांना त्यांच्या मनाप्रमाणे काम करता येईल. कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठा वाढेल.

Ganesh Visarjan
Astrology : तुमच्या हातावर आहे का 'अशा' रेषा? लग्नानंतर पडेल पैशांचा पाऊस

कन्या राशी -

कन्या राशीसाठी बाप्पा त्यांच्या मार्गावरील सर्व अडथळे दुर करतील. त्यांना त्यांच्या कामात यश मिळेल. हाती घेतलेले काम तुम्ही पुर्णत्वास न्याल. एवढंच नाही तर तुमच्या कुटूंबाचेही तुम्हाला प्रत्येक कामात सहकार्य मिळणार.

तुळ राशी -

तुळ राशींच्या लोकांसाठी येणारे वर्ष खुप उत्तम असणार आहेत. बाप्पा जाता जाता या राशींच्या लोकांना विशेष कृपा करणार ज्यामुळे येणाऱ्या दिवसात त्यांच्या मार्गावरील सर्व अडथळे दुर होतील आणि या राशींच्या लोकांना यशाचा मार्ग मोकळा होणार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com