
Ganesh Visarjan: गणेश विसर्जन करताना 'या' चुका करू नका नाहीतर बाप्पा होणार नाराज
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षानंतर गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सध्या सर्वजण बाप्पांना निरोप देण्यासाठी सज्ज आहे. पण आज आम्ही तुम्हाला गणेश विसर्जन करताना कोणत्या चुका करू नये हे सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
विसर्जन करण्यापुर्वी गणेशजीची पुजा करणे खुप गरजेचे आहे. यावेळी धूप, दिप, फुल -फळ गणेशजीला अर्पण करावे.
नदी तलावात गणपती विसर्जित करताना गणेशजींची आरती करावी. सोबतच १० दिवसात झालेल्या चुकांची माफी सुद्धा मागावी.
गणेश विसर्जन शुभ मुहूर्तावर करावा.
गणेशजींना विसर्जित करताना गणेशजींना तलावात हळू हळू डूबवावे, मुर्ती तुटणार नाही याची काळजी घ्यावी.
घरी जर गणपती विसर्जन करत असाल तर मुर्तीच्या हिशोबाने भांड घ्या आणि त्यात तेवढं पाणी टाकावं.
त्यानंतर विसर्जित केलेलं पाणी एखादया कुंडीत, किंवा झाडांना घालावे. या पाण्यावर कुणाचा चूकूनही पाय पडू देऊ नये.
गणपती विसर्जनाला चुकूनही काळे वस्त्र परिधान करू नये. काळे वस्त्र अशुभ असतात.