मुरबाड तालुक्यात गणपती विसर्जन शांततेत पार

नंदकिशोर मलबारी
मंगळवार, 18 सप्टेंबर 2018

सरळगांव - गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या  म्हणत मुरबाड तालुक्यात गणपती विसर्जन शांततेत पार पडले. डी जे ला बाजूला सारत भजन तर काही ठिकाणी ढोलटाश्याच्या गजरात गणपती बाप्पाची विसर्जनाची मिरवणूक पार पडली. 

सरळगांव - गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या  म्हणत मुरबाड तालुक्यात गणपती विसर्जन शांततेत पार पडले. डी जे ला बाजूला सारत भजन तर काही ठिकाणी ढोलटाश्याच्या गजरात गणपती बाप्पाची विसर्जनाची मिरवणूक पार पडली. 

मुरबाड तालुक्यात विसर्जनाच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र शिवळे गावात पोलीस बंदोबस्त नसतानाही तरूणांनी पोलीसांची भूमीका बजावत कोणताही वाद न होऊ देता विसर्जन शांततेत पार पाडले. शिवळे हे गाव कल्याण - अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गावर असल्याने 2 किलोमीटर विसर्जनाची मिरवणूक ही पूर्णपणे मुख्यरस्त्यावरून होत असतानाही वाहातूकिला अडथळा न आणता, येणा-या जाणा-या गाड्यांमधील प्रवाशांना गुलाल न टाकता. त्यांच्या प्रवासात अडथळा होऊ नये या साठी गावातील तरूण मंडळी अग्रेसर असल्याने वयोवृधांनी या तरूणांना धन्यवाद दिले. मुरबाड शहरातही विसर्जन  शांततेत पार पडले. विसर्जनाच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुरबाड पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस फाटा तैनात करण्यात आला होता. तर दरवर्षा प्रमाणे नगरपंचायतीनेही नदीच्या ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था केली होती. अशी माहीती मुख्याधिकारी पंकज भूसे यांनी दिली. तालुक्यातील मुरबाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत विसर्तजन शांततेत पार पडले असी माहीती निरीक्षक अजय वसावे तर टोकावडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत शांततेत विसर्जन झाल्याची माहीती पोलीस निरीक्षक धनंजय पोरे यांच्या वतिने दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ganpati visrjan in murbad taluka