Pune Ganesh Visarjan : पुण्यात गणपती मंडळांपुढे पोलिस हतबल, कार्यकर्त्यांनी भर गर्दीत उडविलले फटाके, विसर्जन मिरवणूक रेंगाळली

Pune Ganesh Visarjan : मानाचे पाच आणि बाकी महत्वाच्या मंडळांनी वेळा पाळल्या पण त्यानंतर मिरवणूक रेंगाळली. दुसऱ्या दिवशी मिरवणूक सुरु आहेत. मिरवणूक संपायला २-३ वाजण्याची शक्यता आहे.
Devotees participate in Pune Ganesh Visarjan procession as police struggle with crowd control and firecracker chaos at Alka Talkies Chowk.

Devotees participate in Pune Ganesh Visarjan procession as police struggle with crowd control and firecracker chaos at Alka Talkies Chowk.

Updated on
Summary

पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसांचे नियोजन फसले. अलका टॉकीज चौकात कार्यकर्त्यांनी फटाके उडविल्याने मिरवणूक रेंगाळली.

मानाच्या पाच गणपतींचे विसर्जन वेळेत झाले, मात्र इतर मंडळांनी वेळ न पाळल्याने मिरवणूक दुसऱ्या दिवशीही सुरु आहे.

पोलिसांनी एका फटाके उडविल्याप्रकरणी एका कार्यकर्त्याला ताब्यात घेतले.

पुण्यात मानाच्या पाच गणपतींचे काल वेळेत विसर्जन झाले मात्र बाकीच्या मंडळांनी वेळ न पाळल्याने मिरवणूक रेंगाळली. पुणे पोलिस मंडळांपुढे हतबल झाल्याचे दिसून आले. अलका टॉकीज चौकात गर्दीच्या ठिकाणी पोलिसांना न जुमानता काही मंडळांच्या कार्यकर्त्यांनी फटाके उडविले. दरम्यान पोलिसांनी एका कार्यकर्त्याला ताब्यात घेतले आहे. तसेच एका तरुणाकडे कोयता आढळून आला आहे. पोलिस त्याची चौकशी करत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com