सखी-पार्वतीच्या मूर्ती खरेदीसाठी लगबग

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

पुणे - भाद्रपद शुद्ध तृतीयेला सखी आणि पार्वतीसह वाळूच्या शिवलिंग पूजनाची प्रथा आहे. यानिमित्ताने बाजारपेठेत शाडू आणि पीओपीच्या सखी आणि पार्वतीच्या विविधरंगी मूर्ती आल्या आहेत. दोन दिवसांवरच तृतीया आल्याने सखी-पार्वतीच्या मूर्तींसह पूजा साहित्य खरेदीचा आनंद महिलावर्ग घेताना दिसत आहेत.

मंगळवार (ता. २२) पासून भाद्रपद महिना सुरू होत आहे. चारच दिवसांवर गणेशोत्सवही आला आहे. यानिमित्ताने महात्मा फुले मंडई, तुळशीबाग परिसरात पूजा साहित्य खरेदीसाठी सोमवारी दिवसभर भाविकांची गर्दी होती. भगवान महादेवाची पती म्हणून प्राप्ती व्हावी, म्हणून देवी पार्वतीने हे व्रत केल्याची आख्यायिका आहे. म्हणूनच दरवर्षी भाद्रपदातल्या शुद्ध पक्षातल्या तृतीयेला घरोघरी कुमारिका आणि सवाष्णींतर्फे हरितालिका व्रत करण्यात येते. या व्रतानिमित्त सखी, पार्वतीच्या मातीच्या मूर्ती आणि वाळूच्या शिवलिंगाची पूजा करतात. त्यानंतर हरितालिका कहाणीचे वाचन करतात. दुसऱ्या दिवशी भाद्रपद शुद्ध चतुर्थीला दहीभाताचा नैवेद्य दाखवून उत्तरपूजा करण्यात येते. 

पंचांगकर्ते मोहन दाते म्हणाले, ‘‘हरितालिका तृतीयेला सकाळी साडेसहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत पूजा करावी. तत्पूर्वी कुलाचाराप्रमाणे कुलदैवतांचे पूजन करावे.’’

Web Title: pune news Ganesh Festival ganeshotsav