गणेशोत्सव2019 : गणेशोत्सवात रिमझिम सरी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

पुण्यनगरीत गणरायाच्या स्वागतासाठी पावसाच्या हलक्‍या सरी पडण्याची शक्‍यता हवामान खात्याने मंगळवारी वर्तविली. येत्या बुधवार (ता. २८) ते सोमवार (ता. २) या दरम्यान शहर आणि परिसरात हलक्‍या सरी पडण्याची शक्‍यता २५ ते ५० टक्के असल्याचेही खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. 

पुणे - पुण्यनगरीत गणरायाच्या स्वागतासाठी पावसाच्या हलक्‍या सरी पडण्याची शक्‍यता हवामान खात्याने मंगळवारी वर्तविली. येत्या बुधवार (ता. २८) ते सोमवार (ता. २) या दरम्यान शहर आणि परिसरात हलक्‍या सरी पडण्याची शक्‍यता २५ ते ५० टक्के असल्याचेही खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. 

शहरात ढगाळ वातावरण आहे. दिवसभरात पावसाच्या हलक्‍या सरी अधून-मधून हजेरी लावत आहेत. असेच वातावरण गणरायाच्या आगमनापर्यंत पुण्यात राहील. त्यामुळे गणपतीची प्राणप्रतिष्ठेच्या दिवशीही पावसाची सर येण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. 

उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात हलक्‍या ते मध्यम पावसाच्या सरींनी हजेरी लावली आहे. पुढील चोवीस तासांमध्ये राज्यात पावसाच्या हलक्‍या सरींचा अंदाज आहे. तर सिंधुदुर्ग, नंदुरबार, सातारा जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार सरींची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. गुरुवारपासून (ता. २९) पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. 

 मध्य भारतातील कमी दाबाचे क्षेत्र विरून गेल्यानंतर, गुरुवारपर्यंत (ता. २९) बंगालच्या उपसागरात नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत.

तापमानाचा पारा वाढला
शहरात आकाश अंशतः ढगाळ असले तरीही कमाल तापमान एक अंश सेल्सिअसने वाढून २८.७ अंश सेल्सिअस नोंदले गेले. किमान तापमानाचा पारा मात्र, सरासरीपेक्षा १९.४ अंश सेल्सिअस म्हणजे सरासरीपेक्षा १.९ अंश सेल्सिअस कमी नोंदला गेला. पुण्यात एक जून ते २७ ऑगस्ट या दरम्यान सरासरी ४२८.९ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा सरासरीपेक्षा ३५०.५ सेंटिमीटर म्हणजे ७७९.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
गणेश फेस्टिव्हल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain showers in Ganeshotsav