
Ganeshotsav 2022: गव्हाच्या पिठाचे लुसलुशीत मोदक कसे बनवायचे?
गणेशोत्सवात गणपती बाप्पाला मोदकांचा प्रसाद दाखवताना मुलांच्या आवडीचा देखील विचार करा आणि ट्राय करा गव्हाच्या पिठाचे लुसलुशीत मोदक. आजपासून गणेशोत्सव सुरू होत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव प्रमाणेच घरोघरी बाप्पाचे आगमन होते. काही लोकांकडे दहा दिवसांचा उत्सव असतो तर काही लोकांकडे पाच किंवा दीड दिवसाचा उत्सव असतो. उत्सव कितीही दिवसांचा असला तरी बाप्पाला प्रिय असणाऱ्या मोदकांच्या प्रसादाशिवाय तो पूर्ण होत नाही. वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवताना त्यात खास गव्हाच्या पिठाचे लुसलुशीत मोदक
तुम्ही बनवून पहा. चला तर मग जाणून घेऊ या कसे गणपती बाप्पा करीता गव्हाच्या पिठाचे लुसलुशीत मोदक कसे तयार करायचे?
साहित्य:
● खसखस 2 चमचे
● सुक्या खोबरे कीस दोन वाटी
● साजूक तूप अर्धा वाटी
● गव्हाचे पीठ एक वाटी
● साखर दोन वाटी
● दूध दोन कप
● वेलची पूड
सारणाचे साहित्य:
● सुक्या मेवा काप 2 चमचे
● सुक्या खोबरे कीस 2 चमचे
● पिठी साखर
मोदक तयार करण्यासाठी सर्व प्रथम मंद आचे वर कढई गरम करत.थोड दूध टाकावे यामध्ये दोन चमचे खसखस घेऊन मंद आचेवर अगदी अर्धा मिनिट भाजून घ्यावी. खसखस अगदी नाजूक असते त्यामुळे अजिबात गॅस मोठा करायचा नाही. नाहीतर खसखस जाळून जाईल. खसखस भाजली की यामध्ये घालून घ्या अर्धा कप म्हणजे अर्धी वाटी खोबरा किस घालावा.
आता या दोन्हीला आपल्याला मंद आचेवर हलका तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. तर साधारणतः तीन चार मिनिटात त्याला हलक्या तांबूस रंग येईल.
मग त्याला बाहेर काढून थंड करुन घ्या. आता कढाई मध्ये अर्धा कप साजूक तूप घालावे. मंद आचेवर तूप गरम झालं की यामध्ये घालूया एक गव्हाचे पिठ टाकावे. गॅस कमी ठेवून सुरुवातीला हे पीठ चांगलं एकजीव करून घ्यायचे आणि सुरुवातीलाच त्या मध्ये गुठळ्या होत नसेल तर त्या मोडून घ्यायचे. तर या दोन्हीला आता मी चांगला मिक्स केल्यास मंद आचेवरच चांगलं परतून घ्यायचे सतत ढवळत राहायचं म्हणजे करपणार नाही. तर साधारण 5 मिनिटांनी त्याला थोडासे तूप सुटू लागेल. अजून एक मिनिट परतला की आपलंहे पीठ चांगला भाजून होईल. छानसा तांबूस रंग पिठाला येत पर्यंत भाजून घ्यावे. आणि हे पीठ थोडे झाल्याने गॅस बंद करून घ्या आणि याला एका ताटा मध्येकाढून थोडंसं कोमट करून घ्यायचे. हे पीठ अगदी थंड करायचं नाही आपल्याला थोडं कोमट ठेवायचे तोपर्यंत आपण कढईमध्ये घेऊयात.
पुढे तुमच्या आवडीप्रमाणे साखर घालुन यामध्ये दोन कप दूध घालावे.
दुध घातल्यानंतर गॅस मोठा करावा आणि एक दोन तीन मिनिटे ढवळत साखर विरघळून घ्यायची तर दुधामध्ये साखर चांगली विरघळली की गॅस मोठा करून आणि दुधाला उकळी काढायची दुधाला उकळी आली की पुन्हा एकदा ढवळून घ्यावे. आता गॅस कमी करायचा आणि आपण सुरुवातीला भाजून घेतलेली खसखस आणि खोबरे यामध्ये घालायचे.
आता गॅस कमी ठेवून याला एकदा ढवळून घ्या म्हणजे याच्यामध्ये अजिबात गुठळ्या राहणार नाहीत. वेलची पावडर शक्यतो शेवटीच वापरायची कोणत्याही गोड पदार्थांमध्ये म्हणजे तिचा स्वाद अगदी टिकून राहतो. वेलची पावडरघालून चांगले मिक्स करून घ्या वेलची पावडर च्या सोबत तुम्ही जायफळाची पूड सुद्धा वापरू शकता म्हणजे अगदी छान लागेल.तर मिक्स करून झाल्यानंतर हे मिश्रण संपूर्णथंड होत पर्यंत. मोदकाचा स्टॉपिंग तयार करून घ्यावे.
स्टॉपिंग तयार करण्यासाठी दोनते तीन चमचे ड्रायफ्रूट्स चे काप, दोन चमचे काजू-बदामाचे काप आणि एक चमचा पिस्त्याचे काप घ्या.यासोबत यामध्ये दोन चमचे डेसिकेटेड कोकोनट आणि एक चमचा पिठीसाखर घाला.त्याला चांगले मिक्स करून घ्यावे. तर या प्रमाणे आपले स्टॉपिंग तयार झाले. आणि दुसरीकडे आपण जे सारण तयार करून घेतलं होतं ते सुद्धा संपूर्ण थंड झालेले असेल.एकदा सारण थोडस एकजीव करून घ्यायच. आता लगेच त्याचे मोदक तयार करण्यासाठी मध्यम उंचीचा मोदकाचा साचा घ्या याच्या मध्ये आधी थोडेसे पिस्त्याचे काप घालावे. म्हणजे मोदक सुंदर दिसेल तुम्ही हवं तर बदामाचे काप किंवा एखादी केशर काडीसुद्धा वापरू शकता.
थोडसं स्टॉपिंग लांबट करून मोदकाच्या साच्यात भरायचं आणि संपूर्ण दाबून घ्यायचं म्हणजे काय होतं सारं टोकापर्यंत जातं आणि मोदकाचा टोक अगदी सुबक तयार होतं. सारण भरलं की थोडीशी पोकळी तयार करायची आणि त्यामध्ये आपण जे स्टॉपिंग तयार करून घेतले ते भरायच. त्यानंतर पुन्हा थोड सारण घालून घ्या.आणि याला व्यवस्थित दाबून घ्यावे.तयार आहेत आपला मोदक. याप्रमाणे सर्व मोदक तयार करून घ्यावे.