Ganeshotsav 2022: रव्याच्या उकडीचे मोदक कसे तयार करायचे? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ganeshotsav 2022 Modak

Ganeshotsav 2022: रव्याच्या उकडीचे मोदक कसे तयार करायचे?

गणेशोत्सवात गणपती बाप्पाला मोदकांचा प्रसाद दाखवताना मुलांच्या आवडीचा देखील विचार करा आणि ट्राय करा रव्याच्या उकडीचे मोदक गणेशोत्सव 31 ऑगस्ट पासून सुरू होत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव प्रमाणेच घरोघरी बाप्पाचे आगमन होते. काही लोकांकडे दहा दिवसांचा उत्सव असतो तर काही लोकांकडे पाच किंवा दीड दिवसाचा उत्सव असतो. उत्सव कितीही दिवसांचा असला तरी बाप्पाला प्रिय असणाऱ्या मोदकांच्या प्रसादाशिवाय तो पूर्ण होत नाही. वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवताना त्यात खास रव्याच्या उकडीचे मोदक तुम्ही बनवून पहा. चला तर मग जाणून घेऊ या कसे बनवायचे रव्याच्या उकडीचे मोदक

हेही वाचा: Mava Modak: कमी साहित्यात, अगदी कमी वेळात आणि झटपट तयार मावा मोदक कसे करायचे?

आवरणासाठी लागणारे साहित्य :

● एक वाटी बारीक रवा

● सवा वाटी पाणी

● एक चमचा तूप

● पाव चमचा मीठ

सारणासाठी लागणारे साहित्य:

● एक चमचा तूप

● दोन वाटी खवलेला नारळ

● एक वाटी गूळ

● दोन चमचे खसखस किंवा पांढरे तीळ(यापैकी एक)

●आवडी नुसार काजू, बदाम, पिस्ता बारीक तुकडे

हेही वाचा: Ganeshotsav 2022 Recipe: गणपती बाप्पाच्या प्रसादाला तळलेले मोदक कसे तयार करायचे?

कृती:

सर्वप्रथम घेतलेले पाणी उकळत ठेवावे, त्यात तूप मीठ घाला. पाण्याला चांगला उकळी आली कि गॅस लो करावी.आणि त्यात हळूहळू रवा सोडा व कलथ्याने ते मिश्रण चांगले हलवत राहावे.नंतर ते मिश्रण घट्ट झाल की गॅस बंद करून झाकण ठेवावे . आणि ते मिश्रण 15-20 मिनिट सेट होऊ द्यावे.तोपर्यंत आपण इकडे मोदकासाठी लागणारे सारण करून घेऊ या. कढई मध्ये चमचाभर तुपात ड्रायफ्रूटसचे तुकडे परतून घ्यावे, तीळ किंवा खसखस घाला, त्यातच गूळ घालावा.

गूळ चांगला विरघळला कि खवलेला खोबरं घाला.खोबऱ्याचा पाणी सुके पर्यंत परतत राहावे. वेलची जायफळ पूड घालून गॅस बंद करावा. नंतर रव्याची उकड जरासा पाण्याचा हात लावून मळून घ्यावे. अगदी मऊ शिजलेली असते अजिबात वेळ नाही लागतं मळायला. आता आपल्या हवे तसे मोदक तयार करावे.नंतर तयार मोदक 5 मिनिट वाफवून घ्यावे . हे मोदक चवीला अगदी तांदुळासारखे लागतात. कळणारही नाही खाऊन कि रव्याचे आहेत. फक्त या मोदकांचा रंग किंचित पिवळसर येतो रव्यामुळे बाकी खायला एक नंबर लागणारे मोदक नक्की गणपती बाप्पाला आवडतील.

Web Title: Ganeshotsav 2022 How To Prepare Semolina Pickle Modak

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..