Ganeshotsav 2022 : इतर मिठाईंच्या तुलनेत मोदक आरोग्यदायी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ganeshotsav 2022

Ganeshotsav 2022 : इतर मिठाईंच्या तुलनेत मोदक आरोग्यदायी

गोडाशिवाय सर्व सण अपूर्ण वाटतात. जर सणाला गोड नाही खाल्ले तर सगळेच अपूर्ण वाटते. त्यात गणेशोत्सव आणि मोदक नाही असे होणे तर शक्य नाही. दहा दिवसांचा हा उत्सव ३१ ऑगस्टला सुरू होत आहे. प्रसादाला मोदक ठेवण्याची पध्दत आहे.

हेही वाचा: Ganeshotsav 2022 : बाप्पाच्या नैवेद्यासाठी तयार करा गोड सूजीचा शिरा; सोपी रेसिपी ट्राय करा..

इतर मिठाईंच्या तुलनेत मोदक आरोग्यदायी

मोदक बनवण्यासाठी वापरलेली सर्व सामग्री आरोग्यासाठी लाभदायक आहे. जसे यात वापरले जाणारे तूप बध्दकोष्ठतेवर लाभदायी असते. सारणात वापरले जाणारे ओले खोबरे हे फायबरचा उत्तम स्त्रोत आहे. पचनासाठी उपयुक्त असते. मोदकात फॅट्स, अँटीऑक्सिडेंटव मायक्रोन्यूट्रीयंट्स असतात.

हेही वाचा: बाप्पाच्या नैवेद्यासाठी सहा प्रकारच्या ‘फ्लेवर'चे मोदक बाजारात

यासोबतच तूपात व्हिटॅमिन ए, ओमेगा ३ फॅटी ॲसिडचा उत्तम स्रोत आहे. मोदकात तांदळाची पिठी वापरली जाते. यात कॅल्शियम असते. कोलिन असते, ज्यामुळे लिव्हरमध्ये कोलेस्ट्रॉल जमा होण्यापासून रोखले जाते. मोदक पचनास उपयुक्त, कार्डियोव्हॅस्कूलर, लिव्हर आणि हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे.

हेही वाचा: बाप्पाच्या नैवेद्यासाठी मिष्टान्नांची रेलचेल !

यात साखर म वारता गुळ असल्याने शुगर लेव्हल मेंटेन राहते. यात झिंक असल्याने इम्यून सिस्टिमला बूस्ट करते. त्यामुळे इतर गोड पदार्थांशी तुलना केली तर मोदक फार आरोग्यदायी आहे. त्यामुळे मधूमेहीपण याचे मर्यादेत सेवन करू शकतात.

Web Title: Modak Is More Healthy Than Any Other Sweet

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..