esakal | बाप्पासाठी पंचखाद्याची पौष्टिक खिरापत | Panchakhadya Nutritious Recipe
sakal

बोलून बातमी शोधा

Panchakhadya Nutritious

गणेशोत्सवात रोजच्या आरतीच्या आधी "आज प्रसादाला काय?' या गोड विषयावर चर्चा होते. पेढे, बर्फी, लाडू, वड्या, साखर-फुटाणे असे गोडाचे कितीतरी पदार्थ प्रसादाच्या ताटात हजेरी लावतात. गणपतीच्या प्रसादाचा आणखी एक गोड आणि टिकाऊ पदार्थ मदतीला येतो-तो म्हणजे 'पंचखाद्य'. अनेक जण त्याला 'खिरापत' असेही म्हणतात. 

बाप्पासाठी पंचखाद्याची पौष्टिक खिरापत 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गणेशोत्सवात रोजच्या आरतीच्या आधी "आज प्रसादाला काय?' या गोड विषयावर चर्चा होते. पेढे, बर्फी, लाडू, वड्या, साखर-फुटाणे असे गोडाचे कितीतरी पदार्थ प्रसादाच्या ताटात हजेरी लावतात. गणपतीच्या प्रसादाचा आणखी एक गोड आणि टिकाऊ पदार्थ मदतीला येतो-तो म्हणजे 'पंचखाद्य'. अनेक जण त्याला 'खिरापत' असेही म्हणतात.

पूजा किंवा आरतीनंतर हातावर पडणाऱ्या चमचा-चमचाभर प्रसादाचं अप्रूप अजून कमी झालेलं नाही. गणेशोत्सवात रोजच्या आरतीच्या आधी "आज प्रसादाला काय?' या गोड विषयावर चर्चा होतेच होते. पेढे, बर्फी, लाडू, वड्या, साखर-फुटाणे असे गोडाचे कितीतरी पदार्थ प्रसादाच्या ताटात हजेरी लावतात, पण हे पदार्थ आवडले म्हणून फार खाऊन चालत नाहीत. फळांचे तुकडे प्रसादासाठी उत्तम असले तरी ते कापल्यावर पुन्हा ठेवून देता येत नाहीत. अशा वेळी गणपतीच्या प्रसादाचा आणखी एक गोड आणि टिकाऊ पदार्थ मदतीला येतो-तो म्हणजे 'पंचखाद्य'. अनेक जण त्याला "खिरापत' असेही म्हणतात.

सुके खोबरे, खारीक, खसखस, बदाम आणि खडीसाखर असे पाच सुके पदार्थ एकत्र करून हे पंचखाद्य बनवतात. काही जणांकडे त्यात बेदाणेसुद्धा घालतात. आधी चमचाभरच घेतलेला प्रसाद अजून थोडा हवा, असे जेव्हा वाटते तेव्हा हे पंचखाद्य मिठाईपेक्षा तुलनेनं चांगले आणि पौष्टिक पर्याय ठरू शकते.

बिया काढलेल्या खारकेची पूड, किसून मंद भाजलेले सुके खोबरे, बदामाची भरड पूड किंवा काप, भाजून कुटलेली खसखस हे सर्व पदार्थ एकत्र करून त्यात थोडी कुटलेली खडीसाखर घातली की पंचखाद्य तयार! हा प्रसाद टिकाऊ असतो, शिवाय थोडा जास्त खाल्ला गेला तरी त्याने सहसा पोट बिघडत नाही. भरपूर पळापळ करणाऱ्या लहान मुलांसाठी किंवा ज्यांना वजन वाढवायचे आहे त्यांच्यासाठी पंचखाद्य पौष्टिक आहे. अशा लोकांना ते एरवीही अधूनमधून एखादा चमचा तोंडात टाकता येईल.

loading image
go to top