Chinchpokli: गिरणी कामगार एकत्र आले अन् मुंबईतील दुसर सार्वजनिक गणेश मंडळ स्थापन झालं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chinchpokli: गिरणी कामगार एकत्र आले अन् मुंबईतील दुसर सार्वजनिक गणेश मंडळ स्थापन झालं

Chinchpokli: गिरणी कामगार एकत्र आले अन् मुंबईतील दुसर सार्वजनिक गणेश मंडळ स्थापन झालं

मुंबईतील गणेश उत्सवाबद्दल बोलताना चिंचपोकळीच्या चिंतमाणीचं नाव आवर्जून घेतलं जात. याचं कारण म्हणजे, चिंतमाणीचं मंडळ मुंबईत स्थापन झालेलं दुसर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे. या मंडळाची स्थापना 1920 साली झाली आहे. 1892 च्या सुमारास लोकमान्य टिळक यांनी पुण्यातून सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरवात केली होती. अवघ्या काही काळात पुण्यात अनेक सार्वजनिक मंडळे स्थापन झाली. पण मुंबई मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सुरु होण्यास 20 ते 25 वर्षे लागली. याचं कारण म्हणजे मुंबई हे ब्रिटिशांचे Head-quarter होते आणि त्यांच्या समोर लोकांनी एकत्रित येत एखादा सन साजरा करणं हे अतिशय अवघड होतं. त्यातच इंग्रजांच्या नाकावर टिचून सार्वजनिक गणेशोत्सव सुरु करणाऱ्या पहिल्या तीन मंडळांमध्ये चिंचपोकळी च्या या मंडळाच नाव अभिमानाने घेतलं जातं .

त्यावेळी मुंबईतील चिंचपोकळी, लालबाग परळ हा भाग गिरणी कामगारांची वस्ती म्हणून ओळखला जात होता.या मंडळाच्या सुरवातीला बहुतांश लोक हे गिरणी कामगारच होते. लोकमान्य टिळक यांच्या विचारांनी भारावलेल्या या तरुणांनी एकत्र येत 6 सप्टेंबर 1920 रोजी चिंचपोकळी येथे सार्वजनिक मंडळाची स्थापना केली. 6 सप्टेंबर रोजी चिंचपोकळीतील मंडळाची स्थापना झाली त्यानंतर अवघ्या १० दिवसांवर म्हणजेच 16 सप्टेंबर ला गणेश चतुर्थी होती .

अवघ्या दहा दिवसांच्या काळात चिंचपोकळी मंडळातील लोकांनी एकत्र येऊन वर्गणी काढणे, मंडप बनवणे, गणेशमूर्ती आणणे, सजावट करणे यांसारखी सर्व कामे करून मंडळाचा पहिला गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. त्यावेळचा गणेशोत्सव पाहून तुम्हीही थक्क झाला असता कि, या मंडळाची स्थापना होऊन 2 आठवडेही पूर्ण झाले नाहीत. मंडळातील सर्वानी एकत्र येऊन अशक्य ते शक्य करून दाखवलं.

1944 साली मंडळाचे रौप्य महोत्सव साजरे झाले. 1956 साली मंडळाची घटना तयार करण्यात आली. त्यामध्ये 'चिंचपोकळी गणेशोत्सव' हे नाव बदलून चिंचपोकळी उत्सव मंडळ असे नामकरण करण्यात आले. तर, गणेशोत्सव मंडळ हे वर्षातील मर्यादित कालावधीसाठी असते पण मंडळाच्या समाजकार्याचा कालावधी मर्यादित नव्हता. सामाजिक क्षेत्रात वर्षभर कार्यरत व्हावे या हेतूने हे नामकरण करण्यात आले होते.

मंडळाची पहिल्या वर्षाची वर्गणी तर चक्क 4 आणे होती. तर गणपतीच्या स्थापनेच्या अगदी पहिल्या वर्षापासून मुंबईकर गणरायाच्या दर्शनासाठी येत होते. सुरवातीच्या काळात या गणपतीला 'पुलाखालचा गणपती' असे म्हटले जायचे. पण त्यावेळी इंग्रज आपल्याला विरोध करतील अशी चिंता अनेकांच्या मनात येत असे. पण, बघता बघता गणपतीला 25 वर्षे पूर्ण झाली. त्यांनंतर 1945 साली या मंडळाने रौप्य महोत्सवी वर्ष दिमाखात साजरे केले तेही इंग्रजांच्या डोळ्यादेखत. त्यांनंतर पुढच्या दोन वर्षातच भारत स्वातंत्र्य झाला.

चिंचपोकळीच्या या गणेश मंडळासमोर अनेक अडथळे आले. एक काळ असा आला की, मुंबईतील कापड गिरण्या बंद झाल्यामुळे गिरणीकामगार बेरोजगार झाले. त्यातच या मंडळातील बहुतांश लोक हे याच गिरण्यांमद्धे काम करायचे. त्यामुळे अशा आर्थिक संकटाच्या काळात गणेशोत्सव सुरळीत पार पडेल का अशी चिंता सर्वांना होती. अशाही परिस्तिथीत मंडळाचे कार्य चालूच होते .गिरणी कामगार उध्वस्त झाले होते पण त्यांनी गणेशोत्सव थांबू दिला नाही. हि परंपरा अखंडित चालू राहिली आणि हळू हळू या कामगारांचे जीवनही सुरळीत चालू झाले. या काळापासूनच सर्वांची चिंता हरणारा गणपती म्हणून लोक याला चिंतामणी म्हणू लागले आणि हा गणपती चिंचपोकळी रेल्वेस्थानकाच्या बाजूलाच असल्यामुळे याचे नामकरनच “चिंचपोकळी चा चिंतामणी ” असे झाले .या गणपतीची मूर्ती आधीच्या काळी प्रसिद्ध शिल्पकार दीनानाथ वेलिंग हे बनवायचे. त्यांच्या नंतर हि गणेश मुर्ति स्वर्गीय. विजय खातू यांच्या कलाशाळेत बनवली जाऊ लागली. असा हा 'चिंतामणी' आपल्या शतक महोत्सवाच्या पुढे वाटचाल करीत आहे.