esakal | इमरान खान यांच्या भाषणामुळे काँग्रेसवर टीका; ट्विटरवर ShameOnCongress हॅशटॅग
sakal

बोलून बातमी शोधा

pakistan prime minister imran khan

Imran khan speech : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित केले. त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचेही भाषण झाले. त्यांनी भारतात अल्पसंख्याक समाजावर अत्याचार होत असल्याचा आरोप केला. त्यावेळी त्यांनी भारताच्या माजी गृहमंत्र्यांच्या वक्तव्याचा उल्लेख केला आहे. यावरून भाजपने काँग्रेसला लक्ष्य केले आहे. सध्या ट्विटरवर #ShameOnCongress असा हॅशटॅग ट्रेंडिंग आहे.

इमरान खान यांच्या भाषणामुळे काँग्रेसवर टीका; ट्विटरवर ShameOnCongress हॅशटॅग

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

Imran khan speech : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित केले. त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचेही भाषण झाले. त्यांनी भारतात अल्पसंख्याक समाजावर अत्याचार होत असल्याचा आरोप केला. त्यावेळी त्यांनी भारताच्या माजी गृहमंत्र्यांच्या वक्तव्याचा उल्लेख केला आहे. यावरून भाजपने काँग्रेसला लक्ष्य केले आहे. सध्या ट्विटरवर #ShameOnCongress असा हॅशटॅग ट्रेंडिंग आहे.

काय म्हणाले इमरान खान?
पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी संयुक्त राष्ट्रांत केलेल्या भाषणावरून सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. इमरान खान यांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला आहेत. तसेच भारतात अल्पसंख्याक समाजावर अत्याचार होत असल्याचा राग आळवला आहे. त्याला भारताकडून आमसभेतच प्रत्युत्तर देण्यात आले आहे. त्याचबरोबर इमरान खान यांनी भारतात काँग्रेसच्या एका माजी गृहमंत्र्याच्या वक्तव्याचा हवाला देत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दहशतवादी तयार करत असल्याचा आरोप केला आहे. त्यावरून भाजपने काँग्रेसला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

दहशतवाद हे जगापुढील आव्हान : पंतप्रधान मोदी

पाकच्या माजी पंतप्रधानांना मारहाण; तोंडावर फेकला ग्लास 

काय म्हणाले संबित पात्रा?
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी इमरान खान यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. इमरान खान यांच्या संपूर्ण भाषणातील या तुकड्यात इमरान खान काँग्रेसच्या माजी गृहमंत्र्याच्या वक्तव्याचा हवाला देत आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना संबित पात्रा यांनी म्हटले आहे की, सोनिया गांधी तुम्हाला आज खूप आनंद झाला असेल. हिंदू आणि हिंदुस्तानला अपमानित करण्याचा तुमचा जो उद्देश होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर काँग्रेसचे मित्र इमरान खान यांनी त्यात एक पाऊल पुढे टाकले आहे. संबित पात्रा यांच्या या ट्विटनंतर सध्या ट्विटरवर #ShameOnCongress असा हॅशटॅग सुरू झाला आहे. अनेकांनी या भाषणावरून काँग्रेसला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. हिंदूंचा आजवर इतका मोठा अपमान कधीच झाला नव्हता, अशा प्रतिक्रिया ट्विटरवर व्यक्त होत आहेत.