कर्मचाऱ्यांकडून साहेबाला 70 हजार डॉलरची कार

कर्मचाऱ्यांकडून साहेबाला 70 हजार डॉलरची कार

मुंबई - साधारणपणे बॉसबद्दल कर्मचाऱ्यांची मते ही वाईटच असतात; परंतु अमेरिकेतील एका बॉसने कर्मचाऱ्यांना इतके भरभरून दिले आहे की या कर्मचाऱ्यांनी एकत्र येत बॉसला 70 हजार डॉलरहून अधिक किमतीची "टेसला एस‘ ही कार भेट म्हणून दिली आहे. 

अमेरिकेतील "ग्रॅव्हिटी पेमेंट्‌स‘ या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सीईओ डॅन प्राईसचे आभार मानण्यासाठी त्यांचा सहा महिन्यांचा पगार साठवला आणि ही लॅव्हिश कार भेट म्हणून दिली. तुमचा विश्वास बसणार नाही; पण हे खरं आहे. आता जगभरात अनेक लोक साहेबाचा तिरस्कार करत असताना या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या साहेबाला एवढी महागडी कार गिफ्ट का दिली, असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. याचं कारण म्हणजे डॅन प्राईसने कर्मचाऱ्यांचा पगार दुपटीने वाढवला होता एवढेच नव्हे; तर त्याने स्वत:चा पगारही कर्मचाऱ्यांइतकाच केला होता. 

डॅन प्राईसने सर्व कर्मचाऱ्यांचा कमीत कमी पगार तब्बल 70 हजार डॉलरपर्यंत (सुमारे 47 लाख रुपये) वाढवला. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. कारण त्यांचा पगार अक्षरश: दुप्पट झाला होता. एवढ्यावरच डॅन थांबला नाही, त्याने स्वत:चा पगार 1.1 मिलियन डॉलरवरून (सुमारे सात कोटींहून अधिक) सर्व कर्मचाऱ्यांप्रमाणेच 70 हजार डॉलर करण्याचा धाडसी निर्णय घेतला. 

सीईओच्या या निर्णयामुळे "ग्रॅव्हिटी पेमेंट्‌स‘च्या भारावलेल्या कर्मचाऱ्यांनी डॅन प्राईसला सरप्राईज देण्याचे ठरवले. सर्व 120 कर्मचाऱ्यांनी सीईओला नवी कोरी "टेसला मॉडेल एस‘ ही त्याची ड्रीम कार भेट म्हणून दिली. स्वत: डॅन प्राईसने ही आनंदाची बातमी फेसबुकवर शेअर केली आहे. डॅनला त्याची ड्रीम कार भेट देण्याची कल्पना 24 वर्षांची सिंगल मदर असलेल्या अलिसा ओनीलची होती. सिंगल मदर असल्याने पगारवाढीचा निर्णय तिच्यासाठी अतिशय महत्त्वाचा होता. कर्मचाऱ्यांनी डॅनला कार गिफ्ट केल्यानंतर त्याच्या प्रतिक्रियेचा व्हिडिओ "ग्रॅव्हिटी पेमेंट्‌स‘ने यू ट्यूबवर शेअर केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com