102 वर्षाच्या हॅरी गॅम्परने सांगितले दीर्घायुष्याचे रहस्य

फक्त या गोष्टींनी मिळाले एवढे वय
Harry Gamper
Harry Gamper esakal

प्रत्येकाला दीर्घायुष्य जगायचे असते पण आजकाल सुस्त जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, आजारांचा धोका यामुळे तरुण वयातच लोक मरत आहेत. विज्ञान सांगते की, जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या माणसाला दीर्घायुष्य देऊ शकतात. उदाहरणार्थ, बदाम, बेरी किंवा मासे खाल्ल्याने शरीराला मिळणारे पोषण हृदयाचे आरोग्य सुधारते आणि प्रतिकारशक्ती देखील मजबूत होते.

अशा इतर अनेक गोष्टी आहेत ज्या माणसाचे आयुष्य वाढवू शकतात. अलीकडेच एका व्यक्तीने त्याचा 102 वा वाढदिवस साजरा केला आणि तो अजूनही पूर्णपणे निरोगी आहे. या 102 वर्षीय व्यक्तीने आपल्या दीर्घ आयुष्याचे रहस्य सांगितले आहे. यासोबत हे देखील सांगण्यात आले आहे की, कोणत्या गोष्टी खाल्ल्याने ते निरोगी राहतात.

कोण आहेत हे 102 वर्षांचे व्यक्ति

या 102 वर्षीय दिग्गजाचे नाव हॅरी गॅम्पर आहे. जो दुसऱ्या महायुद्धातील निवृत्त पायलट आहे. युद्धादरम्यान ते आरएएफ पायलट होते आणि डी-डे लँडिंगमध्ये उपस्थित होते. त्यांचा जन्म 1920 मध्ये झाला. कोरोनाच्या काळात 2020 मध्ये त्यांना आपला 100 वा वाढदिवस साजरा करायचा होता पण ते करू शकले नाहीत. फ्रान्स आणि जर्मनीमध्ये त्यांच्या सेवेबद्दल त्यांना पदकेही मिळाली आहेत. त्यांनी अटलांटिकच्या लढाईत महत्त्वाची भूमिका बजावली आणि RAF मध्ये पायलट म्हणून 1,000 तास उड्डाण केले.

RAF मध्ये सेवा दिल्यानंतर, त्यांनी 1983 मध्ये लग्न केले आणि त्यांना दोन मुले झाली. डेव्हिड आणि अँड्र्यू अशी त्याच्या मुलांची नावे होती. निवृत्त झाल्यानंतर ते आयरशायर (स्कॉटलंड) येथे राहत आहेत.

Harry Gamper
America : केंटकीमध्ये अचानक आलेल्या पुरामुळं 16 जणांचा मृत्यू

दीर्घायुष्याचे रहस्य

हॅरी गॅम्परच्या दीर्घायुष्याचे रहस्य म्हणजे उत्तम वाइन, चांगले अन्न आणि संगीत. 2022 मध्ये आपला 102 वा वाढदिवस साजरा करणाऱ्या हॅरी गॅम्परने मुलाखती दरम्यान सांगितले की, "माझे आयुष्य खूप सुंदर आहे आणि मी नेहमीच माझे आयुष्य खूप चांगले जगले आहे. मला कला, संगीत, चांगले अन्न आणि उत्तम वाइन आवडते. या सर्व गोष्टी आणि बरेच काही. माझ्या आजूबाजूचे लोक जीवनात सर्वात महत्वाचे आहेत. हे माझ्या दीर्घायुष्याचे रहस्य आहेत."

शास्त्रज्ञांनी दीर्घायुष्याचे रहस्यही काढले शोधून

यूके-आधारित सीबीडी कंपनी ईडन गेटने जगातील सर्वात वृद्ध लोकांचा त्यांच्या दीर्घ आयुष्याचे रहस्य शोधण्यासाठी अभ्यास केला. 100 वर्षांहून अधिक जगलेल्या सहा लोकांवर संशोधकांनी संशोधन केले. त्यांनी निरोगी आणि दीर्घायुष्यामागील चार मुख्य घटकांकडे पाहिले - हालचाल, सामाजिक-आर्थिक स्थिती, तणाव पातळी आणि आहार. या अभ्यासात 122 वर्षीय जीन लुइस कालमेंट यांच्या आहारावरही विचार करण्यात आला, जो जगातील सर्वात जास्त काळ जगणारा व्यक्ती आहे. 1977 मध्ये त्यांचे निधन झाले. शास्त्रज्ञांनी सांगितले होते की, कोणत्या तीन गोष्टी खाल्ल्याने दीर्घायुष्य मिळू शकते.

ऑलिव्ह ऑईल: संशोधकांनी जीन लुइस कालमेंटच्या आहारातील तीन विशेष गोष्टी पाहिल्या. त्याच्या आहाराचे पहिले रहस्य ऑलिव्ह ऑइल होते. हेल्थलाइनच्या अहवालानुसार ऑलिव्ह ऑइलमध्ये हेल्दी फॅट, अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात. त्यामुळे हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोकाही कमी होतो.

रेड वाईन: जीन लुइस कालमेंटच्या आहाराचे दुसरे रहस्य म्हणजे रेड वाईन. मेयो क्लिनिकच्या अहवालानुसार, रेड वाईनमध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट्स आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी खूप चांगले असतात. त्यामुळे तज्ञ नियमितपणे रेड वाईन वापरण्याचा सल्ला देतात.

चॉकलेट: चॉकलेट खाणाऱ्यांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे. Kalment Diet आणि Hopkins Medicine नुसार चॉकलेट खाल्ल्याने वय वाढते. चॉकलेट रक्ताभिसरणाला समर्थन देऊन आणि मेंदूच्या कार्याला चालना देते आणि उत्साह निर्माण करते

Harry Gamper
पत्रकार-वृत्त संस्थांच्या पोस्ट डिलीट करण्यात भारत अव्वल; ट्विटरचा अहवाल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com