पत्रकार-वृत्त संस्थांच्या पोस्ट डिलीट करण्यात भारत अव्वल; ट्विटरचा अहवाल | India Tops Globally In Seeking Removal Of Journalists' Posts says Twitter Report rad88 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

twitter

पत्रकार-वृत्त संस्थांच्या पोस्ट डिलीट करण्यात भारत अव्वल; ट्विटरचा अहवाल

नवी दिल्ली : भारतात सातत्याने लोकशाही धोक्यात आल्याची टीका होते. तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केंद्र सरकारकडून दबाव आणला जात असल्याची टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली होती. त्यातच आज ट्विटरने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये भारतातून पत्रकांरांच्या पोस्ट डिलीट करण्यासाठी इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक मागणी करण्यात आली आहे. (Twitter Report news in Marathi)

मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने म्हटलं की जुलै-डिसेंबर 2021 दरम्यान ट्विटरवर पत्रकार आणि वृत्त संस्थांद्वारे पोस्ट केलेली सामग्री काढून टाकण्यासाठी भारताने जागतिक स्तरावर सर्वाधिक कायदेशीर मागण्या केल्या आहेत. ट्विटरने नुकताच आपला पारदर्शक अहवाल प्रसिद्ध केला आहे. ट्विटरने ज्यामध्ये म्हटलं की, जागतिक पातळीवर विविध ट्विटर खात्यांची माहिती मिळविण्यासाठीच्या विनंत्या, जगाच्या तुलने १९ टक्के भारतातून आल्या. यामध्ये भारत अमेरिकेच्या मागे आहे.

सर्व प्रकारच्या वापरकर्त्यांचे जुलै-डिसेंबर 2021 दरम्यान Twitter वरील पोस्ट डिलीट करण्यासाठी ट्विटरला आदेश देणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे. ट्विटरने म्हटले की जगभरातील अधिकृत पत्रकारांची 349 खाती आणि वृत्त आउटलेटच्या पोस्ट काढून टाकण्यासाठी 326 कायदेशीर मागण्या आल्या असून त्या विचाराधीन आहेत. जानेवारी-जून 2021 तुलनेत यामध्ये 103 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सर्व प्रकारच्या वापरकर्त्यांचे जुलै-डिसेंबर 2021 दरम्यान Twitter वरील पोस्ट डिलीट करण्यासाठी ट्विटरला आदेश देणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे. ट्विटरने म्हटले की जगभरातील अधिकृत पत्रकारांची 349 खाती आणि वृत्त आउटलेटच्या पोस्ट काढून टाकण्यासाठी 326 कायदेशीर मागण्या आल्या असून त्या विचाराधीन आहेत. जानेवारी-जून 2021 तुलनेत यामध्ये 103 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

यामध्ये भारताकडून सर्वाधिक 114 कायदेशीर मागण्या आल्या असून तुर्की (78), रशिया (55) आणि पाकिस्तानने 48 मागण्या केल्या आहेत. जानेवारी-जून 2021 मध्येही भारत या यादीत अव्वल होता. या कालावधीत, जागतिक स्तरावर 231 पैकी 89 मागण्या भारताने केल्या होत्या.

Twitter ने म्हटले की कायदेशीर मागण्यामध्ये न्यायालयीन आदेश आणि इतर पोस्ट काढून टाकण्यासाठीच्या इतर औपचारिक मागण्यांचा समावेश आहे. तपशील न देता, 2021 च्या जानेवारी-जून या कालावधीत 11 ट्विट डिलीट करण्यासाठी सांगण्यात आले होते. 2021 च्या जुलै-डिसेंबर कालावधीत जागतिक स्तरावरील अधिकृत पत्रकार आणि वृत्त संस्थांचे 17 ट्विट डिलीट करण्यात आले होते.