हवाई दलाच्या दोन हेलिकॉप्टरची धडक; 15 ठार

वृत्तसंस्था
Wednesday, 14 October 2020

अफगाणिस्तानात हवाई दलाच्या दोन हेलिकॉप्टरची धडक होऊन झालेल्या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. अफगाणिस्तानच्या दक्षिण भागातील हेलमंदच्या नावा जिल्ह्यात ही दुर्घटना घडली.

काबूलः अफगाणिस्तानात हवाई दलाच्या दोन हेलिकॉप्टरची धडक होऊन झालेल्या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. अफगाणिस्तानच्या दक्षिण भागातील हेलमंदच्या नावा जिल्ह्यात ही दुर्घटना घडली.

परिक्षा हॉलमध्ये जाण्यापूर्वी सुरू झाल्या प्रसुतीवेदना...

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, कमाडोंना परत आणण्यासाठी आणि जखमी सैनिकांना हेलिकॉप्टरने नेण्यात येत होते. त्यावेळी दोन्ही होलिकॉप्टर हेलमंद भागात समोरसमोर आल्याने त्यांच्यात धडक झाली. या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने या अपघाताबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. प्रांतीय राज्यपालांचे प्रवक्ते ओमर झवाक यांनी नावा जिल्ह्यात झालेल्या अपघाताला दुजोरा दिला. मात्र, घटनेबाबत अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. दुर्घटनेतील मृतांची निश्चित संख्या समजली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 15 feared dead after two army helicopters collide in afghanistan