परिक्षा हॉलमध्ये जाण्यापूर्वी सुरू झाल्या प्रसुतीवेदना...

वृत्तसंस्था
Tuesday, 13 October 2020

परिक्षेची तयारी झाली होती. पेपर सुरू होण्यासाठी अर्धा तास वेळ असतानाच प्रसुतीच्या वेदना सुरू झाल्या. पेपर लिहीत असताना वेदना असह्य झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रसुतीनंतर महिलेने पुन्हा परिक्षा दिली.

शिकागो: परिक्षेची तयारी झाली होती. पेपर सुरू होण्यासाठी अर्धा तास वेळ असतानाच प्रसुतीच्या वेदना सुरू झाल्या. पेपर लिहीत असताना वेदना असह्य झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रसुतीनंतर महिलेने पुन्हा परिक्षा दिली.

Video: लॉकडाऊनचा परिणाम; रोटीची अवस्था पाहा...

ब्रायना हिल असे महिलेचे नाव असून, त्या अमेरिकेतील इलियॉन येथे राहतात. शिकागो लॉ स्कूलमधून त्या वकीलीची परीक्षा देत असताना प्रसुती वेदना सुरू झाल्या होत्या. सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, ब्रायनाला परीक्षा सुरू होण्याआधी 30 मिनिटे प्रसुती वेदना सुरू झाल्या होत्या. पण, परिक्षा देण्याचा निर्णय घेतला. वेदना होत असतानाही पेपर लिहीत होती. पण, वेदना सहन न झाल्यामुळे अखेर नवऱ्याला बोलवण्यात आले. त्यानंतर ब्रायनाला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सायंकाळी साडेपाच वाजता ब्रायना रुग्णालयात दाखल झाली. प्रसुती रात्री 10 वाजता झाली. बाळ आणि आई दोघेही सुखरूप होत्या.

फेसबुकवरील मैत्रिण निघाली तीन मुलांची आई...

ब्रायनाचा दुसऱ्या दिवशी दुसरा पेपर होता, अखेर विद्यापीठाची परवानगी घेऊन ब्रायनाने रुग्णालयातून दुसरा पेपर दिला आहे. प्रसुती झालेली असतानाही विद्यापीठाने रुग्णालयातून परिक्षा देण्याची परवानगी दिल्याबद्दल तिने रुग्णालय प्रशासन आणि विद्यापीठाचे आभार मानले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: woman gave a birth to child while writing exam in labor pain