152 पाकिस्तानी दहशतवाद्यांचा अफगाणिस्तानमध्ये खात्मा; अफगाण सुरक्षा दलाची कारवाई

सकाळ वृत्तसेवा
Monday, 16 November 2020

कमीतकमी 152 पाकिस्तानी दहशतवादी मारले गेले आहेत.

काबूल : अफगाणिस्तानच्या इंटेरियर अफेयर्स मंत्रालयाने रविवारी एक यादी जाहिर करुन म्हटलंय की, हेलमंद आणि कंदाहारमध्ये एक महिन्याआधी सुरु केलेल्या एका अभियानामध्ये जवळपास 70 तालिबानी दहशतवादी मारले आहेत. तालिबान्यांच्या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी अफगानी सुरक्षादलांनी हे ऑपरेशन राबवलं होतं. मंत्रालयाने माहिती दिल्याप्रमाणे 20 दहशतवादी कमांडर वेगवेगळ्या ठिकाणचे होते. तसेच 45 ते 100 दहशतवाद्यांचे ते नेतृत्व करत होते. तर कंदाहारमध्ये जवळपास 40 तालिबानी दहशतवादी कमांडर मारले गेले आहेत. 

हेही वाचा - SpaceXच्या 4 अंतराळवीरांचं फ्लोरिडातील नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून उड्डाण​
कमीतकमी 152 पाक दहशतवादी ठार
हेलमंदमध्ये मारले गेलेले 10 कमांडर उरुजगा, कंदाहार आणि गजनीमधून आलेले होते. पत्रकारांच्या समोर ही यादी जाहीर करत मंत्रालयाने सांगितलं की कमीतकमी 152 पाकिस्तानी दहशतवादी मारले गेले आहेत. मिळालेल्या आकडेवारीनुसार, 65 मृतदेहांना डुरंड लाईनद्वारे ट्रान्सफर केलं गेलं आहे. तर 35 मृतदेहांना फराह, 54 मृतदेहांना हेलमंद तर 13 मृतदेहांना जाबुल आणि 13 मृतदेहांना उरुजगान प्रांतात पोहचवलं गेलं आहे. 

134 सामान्य नागरिकांचाही मृत्यू
या दरम्यान 30 तालिबानी कमांडर हेलमंदमध्ये जखमी झाले आहेत. या ऑपरेशनचे नेतृत्व चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल मोहम्मद यासिन यांनी केलं आहे. हे ऑपरेशन अद्याप सुरु आहे. मात्र, मंत्रालयाने दावा केलाय की याद्वारे तालिबानला मात दिली गेलीय. प्रवक्त्याने असं देखील सांगितलं आहे की, तालिबानच्या हल्ल्यात मागच्या 25 दिवसांत कमीतकमी 134 सामान्य लोक मारले गेले आहेत. तसेच 289 लोक जखमी झाले आहेत. तर तालिबानने मंत्रालयाच्या या वक्तव्याचे खंडन केलं आहे. 

हेही वाचा - 'इतक्यात नाहीच... कोरोनातून सावरायला आणखी वेळ लागणार'

अफगाणिस्तानात सक्रिय होते पाकिस्तानी दहशतवादी
जुलैमध्ये जाहीर केलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या एका रिपोर्टमध्ये म्हटलं गेलं होतं की, पाकिस्तानचे जवळपास 6,000 ते 6,500 दहशतवादी शेजारच्या अफगाणिस्तानात सक्रिय आहेत. ज्यातील अधिकतर दहशतवाद्यांचा संबंध 'तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान' या संघटनेशी आहे. आणि ते दोन्हीही देशासाठी घातक आहेत. अमेरिकेचा सुरक्षा विभाग पेंटागॉनने देखील अफगानिस्तानवर काढलेल्या आपल्या रिपोर्टमध्ये अफगाणिस्तान आणि पाकिस्तान सीमा क्षेत्राला दहशतवादी संघटनांसाठी सुरक्षित ठिकाण असल्याचा निर्वाळा दिला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 152 Pakistani terrorists in Afghanistan killed by Afghan forces operations