अंत्यसंस्कार करण्यापूर्वी युवतीने केली डोळ्यांची उघडझाप

वृत्तसंस्था
Wednesday, 26 August 2020

एका 20 वर्षीय युवतीला डॉक्टरांनी मृत घोषीत केल्यानंतर मृतदेह पालकांच्या ताब्यात दिला होता. पालकांनी अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्याच्या काही क्षण अगोदर युवतीने डोळे उघडले. यामुळे कुटुंबियांना मोठा आनंद झाला.

डेट्रॉईट (अमेरिका): एका 20 वर्षीय युवतीला डॉक्टरांनी मृत घोषीत केल्यानंतर मृतदेह पालकांच्या ताब्यात दिला होता. पालकांनी अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्याच्या काही क्षण अगोदर युवतीने डोळे उघडले. यामुळे कुटुंबियांना मोठा आनंद झाला.

धर्मेंद्र म्हणाले; योगायोग! माझ्या अंगणात मोरनी आली पण...

डेट्रॉईट शहरातील एक युवती बेशुद्ध पडली होती. तिच्या कुटुंबियानी डॉक्टरांना बोलवले. डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केले. पण, युवती उपचारांना प्रतिसाद देत नव्हती. पुढील उपचारासाठी तिला आयसीयुमध्ये दाखल करण्यात आले. पण, तिची प्रकृती खालावत गेली. काही काळानंतर शरिराची हालचालही बंद झाली. आपत्कालीन कक्षातील डॉक्टरांनी रुग्णाला मृत घोषित केले. यानंतर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. युवतीचा मृतदेह शवविच्छेदन न करता कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आला. अंत्यसंस्कारासाठी मृतदेह डेट्रॉईटमधील जेम्स एच कोल येथे नेण्यात आला. पण, अंत्यसंस्काराच्या काही क्षण अगोदर युवतीने डोळ्यांची उघडझाप केली. स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांना युवती जिवंत असल्याचे कळले. काही वेळानंतर डोळे उघडले आणि उठूनही बसली. यामुळे कुटुंबियांना मोठा आनंद झाला. पण, डॉक्टरांनी केलेल्या चुकीमुळे एक मोठा अनर्थ टळल्याची भावना तिच्या कुटुंबियांनी व्यक्त केली.

शवगृहात ठेवलेला मृतदेह उठून बसला अन् लागला पळू...

दरम्यान, रशियामध्ये काही दिवसांपर्वी अशीच एक घटना घडली होती. एक ८१ वर्षांची आजी मृत घोषित केल्यानंतर तब्बल सात तासानंतर जिवंत असल्याचे पाहायला मिळाले. झिनिडा कोनोकोव्हाची (वय ८१) असे आजींचे नाव आहे. १४ ऑगस्ट रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रीयेनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यानंतर १ वाजून १० मिनिटांनी त्यांचे पार्थिव शवगृहात ठेवण्यात आले. पण, दुसऱया दिवशी आठ वाजता म्हणजे सात तासांनी आजी उठून बसल्या होत्या. शवगृहात काम करणारी एक कर्मचारी घाबरून जोर-जोरात ओरडू लागला आणि पळत बाहेर आल्या होत्या. यानंतर आजींना उपचारासाठी डॉक्टर घेऊन गेले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 20 year old girl was declared dead discovered alive in funeral at detroit usa

Tags
टॉपिकस