रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमधील २०२ शाळा आणि ३४ रुग्णालयं उद्ध्वस्त!

युद्धाचे परिणाम किती वाईट असू शकतात हेच या आकडेवारीवरुन पुन्हा एकदा आधोरेखित झालं आहे.
Ukraine Building Damage
Ukraine Building Damage
Updated on

कीव्ह : युक्रेनवर आक्रमण (Russia invasion) केल्यानंतर गेल्या पंधरा दिवसांत युक्रेनमधील २०२ शाळा आणि ३४ रुग्णालयं उद्ध्वस्त झाली आहेत. त्याचबरोबर १५०० निवासी इमारतीही यामध्ये उद्ध्वस्त झाल्या आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांचे सहकारी पोडोलियाक यांनी ही माहिती दिली. युद्धाचे परिणाम किती वाईट असू शकतात हेच या आकडेवारीवरुन पुन्हा एकदा आधोरेखित झालं आहे. (202 schools 34 hospitals in Ukraine destroyed by Russia so far says report)

Ukraine Building Damage
'जर पुतिन घाबरले नसतील तर...'; लाईव्ह लोकेशन देत झेलेन्स्कींचं आव्हान

पोडोलियाक म्हणाले, एकवीसाव्या शतकातील हा रानटी प्रकार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. रशियानं 202 शाळा, 34 रुग्णालयं, 1500 पेक्षा अधिक निवासी इमारतींचं नुकसान झालं आहे. आमच्या 900 पेक्षा अधिक वसाहती वीज, पाणी, ऊर्जा यांपासून पूर्णपणे वंचित आहेत. रशियन सैन्याला इतर सैन्यांशी कसं लढायचं हे माहिती नाही, परंतू नागरिकांना मारणं त्यांना चांगलं वाटतं आहे,” असं ट्विट पोडोलियाक यांनी केलं आहे.

Ukraine Building Damage
निकटवर्तीयांवरील छापेमारीनंतर आदित्य ठाकरेंची मोजक्या शब्दात प्रतिक्रिया

रशियानं युक्रेनचे विलग झालेले प्रदेश डोनेस्तक आणि लुहान्स्क यांना स्वतंत्र प्रजासत्ताक म्हणून मान्यता दिली होती. त्यानंतर 24 फेब्रुवारीला रशियन सैन्यानं युक्रेनमध्ये लष्करी कारवाया सुरू केल्या आणि युक्रेनचे 'असैनिकीकरण' आणि 'निश्चितीकरण' करण्यासाठी 'विशेष लष्करी ऑपरेशन'ची घोषणा केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com