'जर पुतिन घाबरले नसतील तर...'; लाईव्ह लोकेशन देत झेलेन्स्कींचं आव्हान

Volodymyr Zelensky y- Vladimir Putin
Volodymyr Zelensky y- Vladimir Putinesakal

युक्रेन आणि रशिया या दोन देशांमध्ये सध्या युद्ध सुरु आहे. या युद्धाचा आजचा तेरावा दिवस असून काल दोन्ही देशांमध्ये चर्चेची तिसरी फेरी झाली आहे. मात्र, ही फेरी देखील निष्फळ ठरली असून चौथी फेरी लवकरच होणार आहे. युक्रेनला रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची आणि राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची थेट समोरासमोर चर्चा हवी आहे. काल मंगळवारी युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलंय की, रशियाच्या सलग तेरा दिवसांच्या बॉम्बहल्ल्यांना आम्ही तोंड दिलं आहे. तसेच पुतिन यांच्यावर टीका करताना त्यांनी म्हटलंय की, झेलेन्स्की या युद्धकाळात एक प्रेरणादायी नेतृत्व म्हणून पुढे आले असून 'त्यांना कशाचीही भीती वाटत नाही', असंही घोषित केलंय. दुसरीकडे, झेलेन्स्की यांनी इन्स्टाग्रामवर आपलं लोकेशन शेअर केलंय आणि पुतिन यांना थेट आव्हान दिलं आहे.

Volodymyr Zelensky y- Vladimir Putin
निकटवर्तीयांवरील छापेमारीनंतर आदित्य ठाकरेंची मोजक्या शब्दात प्रतिक्रिया

झेलेन्स्की यांनी यावेळी त्यांनी म्हटलंय की, मी लपलेलो नाहीये तसेच मी कोणालाही घाबरत नाही. मी कीव्ह आणि बोकोवा स्ट्रीटवर राहतो. मी लपलेलो नाही. मी कोणालाही घाबरत नाही,” असं त्यांनी म्हटलंय. या युद्धात आपणच जिंकणार असल्याचा युक्रेनचा निर्धार कायम आहे.

Volodymyr Zelensky y- Vladimir Putin
'मातोश्री'च्या निकटवर्तीयांवर आयटी विभागाची छापेमारी

झेलेन्स्की यांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलंय की, "आम्हाला युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष आणि व्लादिमीर पुतीन यांच्यात थेट संवाद झालेला हवा आहे, कारण विशेषत: आताच्या या काळात आपल्याला माहिती आहे की, हेच दोघे अंतिम निर्णय घेऊ शकतात."

"आमचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी थेट भेटीला तसेच इतर कोणत्याही गोष्टीला घाबरत नाहीत. जर पुतिन देखील घाबरले नसतील, तर त्यांनाही या बैठकीत येऊ द्या, त्यांना बसू द्या आणि बोलू द्या.", असं त्यांनी म्हटलंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com