Vladimir Putin: "रशियातील निवडणुका केवळ लबाडी," अमेरिकेतून पुतीन यांच्यावर का होतेय टीका?

2024 Russia Presidential Election: निरीक्षकांना निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष होतील अशी आशा कमी आहे. मतदारांकडे फार कमी पर्याय आहेत
2024 Russia Presidential Election
2024 Russia Presidential ElectionEsakal

Presidential Election Of Russia 2024:

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियामध्ये राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक सुरू आहे. आजपासून (१५ मार्च) राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुन्हा निवडून येणार हे निश्चित मानले जात आहे.

पुतीन यांनी नुकतेच एका व्हिडिओ संदेशात रशियन नागरिकांना मतदान केंद्रांवर जाऊन निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन केले.

रशियामध्ये 15-17 मार्च रोजी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका होणार आहेत. पुतीन हे पाचव्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष होतील अशी अपेक्षा आहे.

दरम्यान रशियात होत असलेल्या निवडणुका केवळ एक लबाडी आहे, अशी टीका अमेरिकेतून होत आहे. यातून ते अप्रत्यतक्षपणे पुतिन यांच्यावर टीका करत आहेत.

७१ वर्षीय पुतिन त्यांच्या पाचव्या कार्यकाळासाठी निवडणूक लढवत असताना त्यांच्यासमोर एकही विरोधक नाही. त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी एकतर तुरुंगात आहेत किंवा परदेशात आसरा घेत आहेत. पुतिन यांचे कट्टर विरोधक मानले जाणारे ॲलेक्सी नवलनी यांचा नुकताच तुरुंगात मृत्यू झाला होता.

2024 Russia Presidential Election
Farhattulah Ghori: भारताविरोधात युद्ध पुकारा ! अक्षरधाम मंदिरावर हल्ला करणाऱ्या मास्टरमाईंडने केले मुस्लिम तरुणांना चिथावणी

निरीक्षकांना निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष होतील अशी आशा कमी आहे. मतदारांकडे फार कमी पर्याय आहेत. या वस्तुस्थितीपलीकडे, स्वतंत्र देखरेखीच्या शक्यता फार मर्यादित आहेत. रशियातील 100,000 मतदान केंद्रांवर तीन दिवसांत मतदान होणार आहे.

2024 Russia Presidential Election
World Consumer Rights Day 2024 : तुम्हाला माहितीये का जागतिक ग्राहक हक्क दिन का साजरा केला जातो?

अमेरिका ही निवडणूक गांभीर्याने घेत नाही. त्याचबरोबर रशियातील निवडणुका म्हणजे केवळ दिखावा असल्याचे अमेरिकेचे मत आहे.

वॉशिंग्टनमधील सेंटर फॉर युरोपियन पॉलिसी ॲनालिसिस येथील डेमोक्रॅटिक रेझिलियन्सचे संचालक सॅम ग्रीन म्हणाले, "रशियामध्ये होत असलेली निवडणूक ही एक लबाडी आहे. पुतिन निवडणुकीवर नियंत्रण ठेवत आहेत."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com