Farhattulah Ghori: भारताविरोधात युद्ध पुकारा ! अक्षरधाम मंदिरावर हल्ला करणाऱ्या मास्टरमाईंडने केले मुस्लिम तरुणांना चिथावणी

गुजरातमधील अक्षरधाम मंदिरात २२ वर्षांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार फराहतुल्ला घोरी याचा एक व्हिडिओ प्रसिद्ध झाला असून यामध्ये तो भारताविरुद्ध युद्ध पुकारण्याचे आवाहन दहशतवाद्यांना करत असल्याचे दिसत आहे.
India on high alert after terror threat  Farhattulah Ghori
India on high alert after terror threat Farhattulah GhoriSakal

नवी दिल्ली : गुजरातमधील अक्षरधाम मंदिरात २२ वर्षांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार फराहतुल्ला घोरी याचा एक व्हिडिओ प्रसिद्ध झाला असून यामध्ये तो भारताविरुद्ध युद्ध पुकारण्याचे आवाहन दहशतवाद्यांना करत असल्याचे दिसत आहे. पाकिस्तानच्या ‘आयएसआय’ने हा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.

फराहतुल्ला घोरी हा लष्करे तैयबा आणि जैशे महंमद या दहशतवादी संघटनांशी संबंधित आहे. भारतात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात हिंसाचार पसरविण्याच्या हेतूने घोरीने हा व्हिडिओ तयार केल्याचे मानले जाते. दिल्ली पोलिसांनी मागील वर्षी ‘इसिस’चा एक कट उधळला होता, त्याचाही सूत्रधारही घोरीच होता.

युवकांची दिशाभूल करून त्यांना दहशतवादी मार्गाला लावण्याचे काम घोरी करत असून यासाठी तो सोशल मीडियाचा वापर करतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे. दिल्ली, गुजरात आणि आंध्र प्रदेशात तो वाँटेड आहे. त्याने हैदराबादमध्ये विविध ठिकाणी दहशतवादी हल्ले घडवून आणले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने त्याला २०२० मध्ये दहशतवादी घोषित केले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com