Viral Video : देव तारी त्याला कोण मारी! भूकंपाच्या २१ दिवसानंतर ढिगाऱ्याखालून बाहेर आला जीवंत घोडा

Turkey
Turkey

तुर्की आलेल्या भूकंपाने घमासान केले. या भूकंपात अनेक लोकांना प्राण गमवावे लागले. या विनाशकारी भूकंपानंतर २१ दिवसांनी अदियामन शहरातील इमारतीच्या ढिगाऱ्यात एक घोडा जिवंत सापडला आहे. तानसू येगेन नावाच्या नेटकऱ्याने ट्विटरवर एक क्लिप शेअर केली आहे, ज्यामध्ये काही लोकांची एक एक टीम घोड्याला ढिगाऱ्यातून बाहेर काढताना दिसत आहे. 

निसर्ग अनेकदा मानवांना आश्चर्यचकित करतो, कधी आपत्तींनी तर कधी चमत्कारांनी. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच आपण निसर्गाचा कोप पाहिला. मात्र आता चमत्कारही घडला आहे.

Turkey
Manish Sisodia : सिसोदिया प्रामाणिक व्यक्ती, पण...; BJPच्या ज्येष्ठ नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण

तुर्कस्तान-सीरियात झालेल्या विनाशकारी भूकंपात हजारो लोकांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर या भूकंपात सुरू असलेल्या बचावकार्यात अनेक दिवसांनी नवजात बालकांसह अनेकांना ढिगाऱ्याखालून जिवंत बाहेर काढताना अनेक चमत्कार घडत आहेत. 

तुर्कस्तानमध्ये ६ फेब्रुवारीला झालेल्या शक्तिशाली भूकंपानंतर अदियामनला खूप त्रास सहन करावा लागला होता. हा भूकंप इतका तीव्र होता की त्याचे आफ्टरशॉक अजूनही जाणवत आहेत. येथे देशाच्या दक्षिणेकडील भागात सोमवारी ५.६ तीव्रतेचा भूकंप झाला होता. 

तुर्कस्तान आणि सीरियामध्ये भूकंपामुळे आतापर्यंत ४८,००० हून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. 

Turkey
Maharashtra Budget Session 2023: राऊतांवर कारवाई होणार! हक्कभंग समितीची पुनर्रचना; भातखळकर, राणेंचाही समावेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com