Firing : तीन वर्षाच्या मुलाने चालवली गोळी; गोळीबारात आईचा दुर्दैवी मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

firing

Firing : तीन वर्षाच्या मुलाने चालवली गोळी; गोळीबारात आईचा दुर्दैवी मृत्यू

वॉशिग्टन - अमेरिकेत तीन वर्षांच्या मुलाने चुकून बंदुकीची गोळी झाडून आईची हत्या केली. अमेरिकेतील कायदा अंमलबजावणी संस्थेने ही माहिती दिली आहे. शेरीफ ऑफिसच्या फेसबुक पोस्टनुसार, बुधवारी दक्षिण कॅरोलिनामध्ये ही घटना घडली. (Crime news in Marathi)

हेही वाचा: कॅनडामध्ये भारतीय विद्यार्थ्यांवर होताहेत हल्ले; भारताकडून अॅडव्हाझरी जाहीर

या संदर्भात सविस्तर माहिती अशी की, लहान मुलाने हातात एक लॉक नसलेली बंदक पडली होती. त्याची किंमत मुलाच्या आईला आपल्या जीव गमावून मोजावी लागली. शेरीफ कार्यालयाने या महिलेचं नाव कोरा लिन बुश अस आहे. ती स्पार्टनबर्ग येथे राहत होती. गोळी लागल्यानंतर दोन तासांनी 33 वर्षीय महिलेचा स्थानिक रुग्णालयात मृत्यू झाला.

मुलाच्या आजीच्या या संदर्भात जबाब नोंदवला आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, पोलिसांनी आजीचे जबाब आणि घटनास्थळी सापडलेल्या पुरावे एकमेकांशी जुळवले आहेत. पोलिसांनी व्यतिरिक्त पोलिसांनी आणखी कोणतीही माहिती दिली नसून अधिका-यांनी तपास सुरू असल्याचे सांगितले.

हेही वाचा: रशिया, युक्रेनमध्ये मोदीचं प्रस्थापित करु शकतात शांतता; मेक्सिकोचा UNमध्ये दावा

मीडिया रिलीजमध्ये म्हटले की शेरीफच्या कार्यालयाला स्पार्टनबर्ग प्रादेशिक वैद्यकीय केंद्रातून सकाळी 10:35 वाजता कॉल आला होता. हा कॉल गोळीबारात झालेल्या मृत्यूशी संबंधित होता. आता या प्रकरणाची फॉरेन्सिक तपासणी केली जाणार आहे.

Web Title: 3 Years Old Fired A Gun Mother Died Police Recorded Statement In Us

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :crimeamerica