Sologamy Marriage : 'ड्रीम वेडिंग' साठी 20 वर्षे साठवले पैसे, अन् शेवटी स्वतःशीच केलं लग्न

तिला हवा तसा जोडीदार न मिळाल्यामुळे अखेर तिने स्वत:शीच लग्न करण्याचे ठरवले.
Sologamy Marriage
Sologamy Marriage esakal

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात मोठा सोहळा असतो. मुलींसाठी तर हा स्वप्नवत सोहळा असतो, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. लग्नासाठी प्रत्येक मुलीची काही स्वप्ने असतात. कुणाला वेगळ्या ढंगात लग्न करायचं असत तर कुणाला लग्नात काहीतरी हटके करायचं असतं.

इंग्लंडमधील फेलिक्सिस्टो (Felixstowe) शहरामध्ये एका ४२ वर्षीय महिलेने चक्क स्वत:शीच लग्न केले आहे. या महिलेचे नाव साराह विल्किन्सन (Sarah Wilkinson) असे आहे. तिला हवा तसा जोडीदार न मिळाल्यामुळे अखेर तिने स्वत:शीच लग्न करण्याचे ठरवले.

Sologamy Marriage
Hindu Marriage: सप्तपदी झाली तरच लग्न वैध ठरतं का?

तब्बल २० वर्षांपासून तिने तिच्या लग्नासाठी आर्थिक बचत केली होती. मात्र, तिला हवा तसा पार्टनर मिळाला नाही. अखेर तिने ४२ व्या वर्षी तिचे ड्रीम वेडिंग प्लॅन केले, आणि तिने जमा केलेली तब्बल १० लाखांची पुंजी तिने तिच्याच लग्नावर खर्च केली. ती ३० सप्टेंबरला स्वत:शीच विवाहबद्ध झाली.

बीबीसी इंग्लिशने या संदर्भात वृत्त दिले आहे. मिस साराह विल्किन्सन (Sarah Wilkinson) यांनी त्यांच्या या लग्नाबद्दल सांगितले की, लॉकडाऊनमध्ये जेव्हा मी ४० वर्षांची होते, तेव्हा मला या लग्नाची कल्पना सुचली आणि तेव्हा मी मला हवी असलेली डायमंड एंगेजमेंट रिंग खरेदी करण्याचा निर्णय घेतला. ही रिंग मी माझ्या लग्नात घातली.

‘लग्नाचा दिवस हा माझ्यासाठी नेहमी स्वप्नवत राहील. लग्नाच्या दिवशी मी ‘सेंटर ऑफ अ‍ॅट्रॅक्शन’ होते. हे क्षण माझ्यासाठी सर्वात सुंदर होते. माझे लग्न हे अधिकृतरित्या लग्न नसले तरी माझ्यासाठी हा ‘ ड्रीम वेडिंग डे’ होता. असे ही तिने म्हटले आहे.

Sologamy Marriage
Marriages Muhurta : शुभमंगल सावधान, २०२४ मध्ये ६६ विवाह मुहूर्त

माझ्या लग्नासाठी खर्च करण्यात आलेले पैसे हे माझेच होते. माझ्या लग्नासाठी ते मी बचत केले होते आणि मला माझ्यावरच ते खर्च करावे लागले, आणि हे का असू नये असे ही तिने म्हटले आहे.

इंग्लंडमध्ये ३० सप्टेंबरला झालेल्या या लग्नसोहळ्यात साराहचे घरचे ४० जण आणि तिचे मित्र-मंडळी आणि इतर ४० जण तिच्या या आगळ्या वेगळ्या लग्नसोहळ्याला उपस्थित होते. तिच्या या लग्नाची भलतीच चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com