कॅनडात भारतीय विद्यार्थ्यांचा भीषण कार अपघात; पाच जणांचा जागीच मृत्यू

City of Toronto
City of Torontoesakal
Summary

अपघातानंतर दोन गंभीर जखमी प्रवाशांना रुग्णालयात नेण्यात आलंय.

टोरंटो : कॅनडातील (Canada) टोरंटो शहराजवळ (City of Toronto) एका ऑटो अपघातात 5 भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय. या अपघातात अन्य दोघे जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आलंय. टोरंटोमधील भारतीय वाणिज्य दूतावासाची टीम मदतीसाठी पीडितांच्या संपर्कात आहे. कॅनडातील भारताचे उच्चायुक्त अजय बिसारिया (Ajay Bisaria) यांनी ही माहिती दिलीय.

हरप्रीत सिंह, जसपिंदर सिंह, करणपाल सिंह, मोहित चौहान आणि पवन कुमार अशी मृतांची नावं आहेत. त्यांचं वय 21 ते 24 वर्षे दरम्यान होतं. हे सर्व ग्रेटर टोरंटो आणि मॉन्ट्रियल भागातील विद्यार्थी असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. महामार्गावरून प्रवासी व्हॅनमधून ते पश्चिमेकडं जात होते. दरम्यान, शनिवारी पहाटे 3:45 च्या सुमारास ट्रॅक्टर-ट्रेलरची समोरासमोर धडक झाली आणि ही दुर्दैवी घटना घडलीय.

City of Toronto
William Hurt : हॉलिवूड अभिनेता विल्यम हर्ट यांचं निधन

पोलिसांचं (Police) म्हणणं आहे की, अपघातानंतर दोन गंभीर जखमी प्रवाशांना रुग्णालयात नेण्यात आलं. परंतु, त्यांच्या प्रकृतीबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही. सध्या अपघाताचा तपास सुरूय. या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, असंही पोलिसांनी स्पष्ट केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com