
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने साऱ्या जगात थैमान घातले असून काल (ता.३०) केवळ 24 तासात जगभरात 61 हजारहून अधिक रुग्णांची नोंद झाली. यामुळे आता कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 7 लाख 84 हजारावर पोहचली आहे. तर मृतांची संख्या 37 हजार 639 झाली आहे. गेल्या 24 तासात 3419 लोकांचा मृत्यू झाला. यातील अमेरिकेतच 20 हजारहून अधिक नवीन रुग्ण समोर आले आहेत. तर स्पेनमध्ये 913 लोकांचा मृत्यू झाला आहे.
बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
भारतातही कोरोना व्हायरसचा फैलाव जोरात होत असून सोमवारी लॉकडाउनचा 6वा दिवस होता, परंतु संक्रमित लोकांची संख्या वाढतच असल्याचे दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार संक्रमित लोकांची संख्या आतापर्यंत 1251 वर पोहोचली आहे. त्यापैकी 1117 सक्रिय प्रकरणे आहेत, तर 32 लोकांचा कोरोनाने बळी गेला आहे. मात्र, 102 जणांनी या आजारावर मातही केली असल्याची दिलासादायक बाब आहे.
सलमान खानच्या पुतण्याचे मुंबईत निधन
दरम्यान, चीनपेक्षाही इटलीमध्ये कोरोनाचे सर्वात जास्त बळी गेले आहेत. गेल्या 24 तासात 812 लोकांचा मृत्यू झाला, ज्यामुळे देशातील एकूण मृतांची संख्या 11 हजार 591 पर्यंत वाढली आहे. येथे 4050 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आणि एकूण प्रकरणे 1 लाख 01 हजार 739 पर्यंत वाढली आहेत. तर, फ्रान्समध्ये एकाच दिवसात 418 लोक मरण पावले, त्यानंतर एकूण मृत्यूची संख्या 3024 वर गेली आहे. येथे 4376 नवीन प्रकरणे बाहेर आली आहेत आणि एकूण प्रकरणे 44 हजार 550 वर गेली आहेत.
Coronavirus : क्वारंटाईन म्हणजे नेमकं काय? ते केल्याने काय होईल?
अमेरिकेत कोरोना रुग्णांची वाढ झपाट्याने होत आहे. एकाच दिवसात अमेरिकेत 20 हजार 353 नवीन घटना समोर आल्याने हा जगातील एका दिवसाचा कोणत्याही देशाचा सर्वाधिक आकडा आहे. सध्या अमेरिकेत एकूण प्रकरणे 1 लाख 63 हजार 479 आहेत. मृतांची संख्या 3,146 झाली आहे. दुसरीकडे, गेल्या 24 तासांत स्पेनमध्ये आतापर्यंत 913 लोकांचा मृत्यू या संसर्गामुळे झाला. यासह, स्पेनमधील एकूण मृतांचा आकडा 7,716 वर पोहोचला आहे. तेथे 7846 नवीन प्रकरणे आढळून आली असून एकूण प्रकरणांची संख्या 87 हजार 956 पर्यंत वाढली आहे. जर्मनी, इराण आणि ब्रिटनमध्येही हजारो नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
जर्मनीमध्ये कोरोना संक्रमणाची 4450 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. आता जर्मनीत एकूण प्रकरणांची संख्या 66 हजार 885 वर गेली आहे. येथे संक्रमणामुळे 104 लोकांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे मृत्यूची एकूण संख्या 645 वर गेली आहे. तर, इराणमध्ये एका दिवसात 3186 नवीन प्रकरणे नोंदली गेली आणि एकूण प्रकरणे वाढून 41 हजार 495 झाली. येथे 117 लोक मरण पावले, त्यामुळे देशातील एकूण मृतांची संख्या 2757 वर गेली आहे. ब्रिटनमध्येही आतापर्यंतच्या सर्वाधिक एकाच दिवसात संक्रमणाची 2619 प्रकरणांची नोंद झाली आहे. ब्रिटनमध्ये आता एकूण 22 हजार 141 एवढी प्रकरणे झाली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.